धक्कादायक ! महिलेने 15 वर्षीय विद्यार्थ्याला दारू पाजून अश्लील चित्रपट दाखवला, नंतर जे झालं…
कल्याण पूर्वेत पीडीत अल्पवयीन विद्यार्थी कुटूंबासह राहून तो एका इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी महिला ही नाशिकमध्ये राहणाऱ्या पीडित...
कल्याण : एका 32 वर्षीय विवाहीत महिलेने (Married Woman) 15 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना कल्याण कोळशेवाडी (kalyan kolsewadi) परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. कीर्ती घायवटे असं या महिलेचे नाव आहे. आरोपी विवाहित महिलेने पीडित मुलाला दारू व अश्लील चित्रपट बघण्याचे व्यसन लावले असल्याचा आरोप त्या महिलेवरती करण्यात आला आहे. आई-वडिलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलाला भिवंडीच्या सुधागृहात (In Bhiwandi Reformatory) ठेवले आहे. त्याचबरोबर मुलाच्या आई-वडिलांनी कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर विवाहित महिलेविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत पीडीत अल्पवयीन विद्यार्थी कुटूंबासह राहून तो एका इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी महिला ही नाशिकमध्ये राहणाऱ्या पीडित मुलाची आत्याची मानलेली मुलगी असून तिला दोन मुले आहेत. त्यातच पीडित मुलाची आजी कल्याणात राहत असल्याने आत्या तिला पाहण्यासाठी ज्यावेळी कल्याणला आली की, तिच्यासोबत तिची आरोपी 32 वर्षांची मानलेली मुलगी कल्याणला पीडित मुलाच्या घरी येत होती.
दोघांची ओळख होऊन आरोपी महिला आणि पीडित मुलगा यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर महिला नेहमी त्याला दारू पाजून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवत शारीरिक संबंध करायची. त्यामुळे मुलगा दारूचे व्यसनासह मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती बघण्याच्या आहारी गेला. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी त्याला भिवंडीच्या सुधागृहात ठेवले. याच दरम्यान सुधागृहामध्ये मुलाने आपल्याबरोबर घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्या विवाहित महिले विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करत कोळशेवाडी पोलीस तालुक्यातील एपीआय बोचरे , पीएसआय निकिता के.भोईगड , एपीआय पवार यांच्या टीमने महिलेला ताब्यात घेत आपला तपास सुरू केला आहे.