कल्याण डीसीपी ॲक्शन मोडवर, नशेबाज तरुणांना धडा शिकवत अनोखी कारवाई

कल्याण झोन तीन मध्ये महिलांची छेडछाड व रस्त्यावरील नशेबाजांची वाढती समस्या लक्षात घेऊन कल्याण पोलिसांनी नशेबाज तरूणांना चांगलाच इंगा दाखवला आहे.

कल्याण डीसीपी ॲक्शन मोडवर, नशेबाज तरुणांना धडा शिकवत अनोखी कारवाई
कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर,
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 8:21 AM

एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकार कल्याणमध्ये घडल्याने शहर हादरलं. याप्रकणी अटक करण्यात आलेला आरोपी विसाल गवळी हा सराईत गुन्हेगार असून त्याला याआधीही अनेक गुन्ह्यांत तुरूंगाची हवा खावी लागल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कल्याणसह संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण असून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक गुन्हे वाढले आहेत, काही दिवांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाणही करण्यात आली होती. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर असून कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचंच ताजं उदाहरण नुकतंच कल्याणमध्ये पहायला मिळालं. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नशा करणाऱ्या काही तरूणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. रस्त्यावर नशा करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना फटके देत पोलिसांनी त्यांची रस्त्यातच धइडं काढली. एवढेच नव्हे तर त्यांना भररस्त्यात उठाबश्याही काढायला लावत डीसीपींनी त्यांना चांगलाच इंगा दाखवला.

कल्याण डीसीपी ॲक्शन मोडवर

कल्याण झोन तीन मध्ये महिलांची छेडछाड व रस्त्यावरील नशेबाजांची वाढती समस्या लक्षात घेऊन कल्याणचे ॲडिशनल सिटी संजय जाधव तसेच कल्याण डीसीपी अतुल झेंडे याच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवले. रात्री रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यापर्यंत रांगेत चालवत फटके देण्यात आले. तसेच, त्यांना उठाबशा काढण्यास भाग पाडले. कल्याण झोनमधील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले. कल्याण पूर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा संदेश देण्यात आला असून यामुळे आतातरी गुन्हेगारांना थोडाफार वचक बसेल अंशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.