DOMBIVALI NEWS : मोलकरीन बनायची आणि श्रीमंत लोकांची घरं लुटायची, पोलिसांनी सांगितल्या धक्कादायक गोष्टी
CRIME NEWS : चोरी करण्यासाठी महिला काय करतील किंवा चोरटे काय करतील याचा नेम नाही असं आपण कायम म्हणतो. असाच प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.
डोंबिवली : क्राईमच्या (Crime news) रोज असंख्य घटना आपल्याला पाहायला मिळतात, त्यापैकी काही घटना अशा असतात की त्या लोकांना धक्कादायक वाटतात. त्याचबरोबर चोरटे नेहमी नव्या योजना आखून चोरी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत (Dombivali crime news) एका महिलेच्या नव्या चोरी करण्याच्या कल्पनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्या महिलेची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्या महिलेच्या चौकशीत अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या ती महिला रामनगर पोलिसांच्या (ramnagar police) ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
सीसीटिव्हीत महिला दिसल्यानंतर…
पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला सुरुवातील मोलकरीन म्हणून कामाला सुरुवात करायची. घरात असलेल्या लोकांचं मन जिंकायची, त्यानंतर त्या कुटुंबियांनी दिलेल्या चावीची डुप्लीकेट चावी तयार करायची. एकदा चावी तयार झाली की, त्यांच्याशी भांडण करुन काम सोडून द्यायची. घरात कोण कुठल्या वेळेला असतं हे माहित असल्यामुळे चोरी करुन पसार व्हायची ही महिला सीसीटिव्हीत दिसल्यामुळं पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे.
५५ हजार रुपयांची रोकड
डोंबिवलीत एक 70 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या घरी त्या महिलेने चोरी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तीन लाख रुपये त्या महिलेने त्यांच्या घरातून चोरी केले आहेत. सीसीटिव्हीत संबंधित महिला दिसत असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. त्याचबरोबर त्या महिलेकडून ५५ हजार रुपयांची रोकड सुध्दा ताब्यात घेतली आहे. त्या महिलेची कसून चौकशी सुरु असून आणखी गुन्ह्याची उखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिस म्हणाले…
पोलिसांची एक पथक तयार करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. घरात काम करणाऱ्या मोलकरीण सिमा गावडे हिला अटक केली असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी सांगितली आहे.