Kalyan Crime : आरोपीचा माज … विशाल गवळीने याआधीही केला होता अत्याचाराचा प्रयत्न, वर्षभरात दुसरा गुन्हा

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विकृत गुन्हेगार विशाल गवळी, त्याची पत्नीसह एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपी विशालचा हा काही पहिलाचा गुन्हा नसून यापूर्वीही त्याने अशाच गुन्ह्यात तुरूंगची हवा खाल्ल्याचं समोर आलं आहे. जामीनावर बाहेर आलेल्या विशालचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा आहे.

Kalyan Crime : आरोपीचा माज ... विशाल गवळीने याआधीही केला होता अत्याचाराचा प्रयत्न, वर्षभरात दुसरा गुन्हा
कल्याण गुन्ह्यातील आरोपीवर याआधीही अनेक गुन्हे आहेत
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 9:54 AM

कल्याण पूर्वेकडील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विसाल गवळी याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नराधम विशालने त्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला आणि त्यानंतर पत्नी व रिक्षाचालक मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले. यामुळे कल्याणमध्ये खळबळ माजली असून संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गुन्ह्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असून तिनेच त्या मुलीचा मृदेह फेकून देण्यास तसेच घरातील पुरावे मिटवण्यास मदत केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेगाव वरून कल्याण क्राईम ब्रांच ने ताब्यात घेतलं. रात्री कागदोपत्री प्रोसेस पूर्ण करून त्याला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यातील ठेवण्यात आले असून आज दुपारी क्राईम ब्रांचची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यावा कल्याण कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या आरोपीला दुपारनंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस हे कल्याण न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे समजते.

यापूर्वी केला होता अत्याचाराचा प्रयत्न, वर्षभरातला दुसरा गुन्हा

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या केल्याच आरोप असलेला विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात असंख्य गुन्हे आहेत. गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो तसेच विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची देखील कारवाई केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचाराचा हा काही त्याचा पहिलाच गुन्हा नाही, यापूर्वीही त्याने असे अश्लील कृत्य केले होते. साधारण वर्षभरापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये विशाल गवळीला एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी अटक झाली होती. क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरोपी गवळीने तेव्हा केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला अटक झाली, मात्र आरोपीचा मुजोरपणा एवढा होता की पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याने V ( व्हिक्टरीचं) साईन दाखवत, कायदाही आपलं काही बिघडवू शकत नाही, कायद्याला घाबरत नसल्याचे त्याने या कृतीतून दर्शवलं होतं.

पत्नीनेच दिला माहेर जाण्याचा सल्ला

त्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या गवळीने तीन दिवसांपूर्वीच पुन्हा एका अल्पवयीन मुलीला फूस लावून घरातत नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि हे प्रकरण कोणालाही समजू नये म्हणून त्या मुलीचा आवाज कायमचा शांत केला. बायको घरात आल्यावर निर्लज्जपणे आपले कृत्य सांगत, त्याने आपलीच पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह बापगावमधील कब्रस्तानात फेकून दिला.

आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश

कल्याणमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. याप्रकरणातील विकृत आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे. आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा , असे आदेशच फडणवीसांनी पोलिसांना दिले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.