तीन लग्नं, अनेक गुन्हे… नराधम अखेर बायकोसह अटकेत; भयंकर गुन्ह्याने शहरं हादरलं

कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी विशाल गवळीने तीन लग्ने केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत. सीसीटीव्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला, ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे.

तीन लग्नं, अनेक गुन्हे... नराधम अखेर बायकोसह अटकेत; भयंकर गुन्ह्याने शहरं हादरलं
kalyan crime
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 12:26 PM

कल्याण पूर्व येथील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे. आज मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याच्या बायकोलाही अटक केली आहे. पोलिसांनी विशाल गवळीची कसून चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळीने एक दोन नव्हे तब्बल तीन लग्न केले होते. त्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत. विशाल गवळी हा अत्यंत मुजोर आरोपी असल्याचं आढळून आलं आहे. अटक केल्यानंतरही त्याची मुजोरी गेली नाही. त्याने व्हिक्ट्रीचं चिन्ह दाखवलं होतं. त्याच्या या विकृतीमुळे सर्वच हादरून गेले आहेत.

कल्याण पूर्व येथील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे. पोलिसांनी काल रात्री एका रिक्षा चालकाला अटक केली होती. तर आज बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली. पोलिसांनी या तिघांचीही कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी आहे का? याचा तपास करत असून घटनाक्रमही जाणून घेत आहेत.

मालमत्तेचेही गुन्हे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गवळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशालवर मालमत्तेशी संबंधित अनेक गुन्हे असल्याचं आढळून आलं आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड आणि लहान मुलांचे लैगिंक शोषण करणे आदी गुन्हे असल्याचंही सांगितलं जात आहे. तो विकृत इसम असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याची कुंडली काढली असता त्याने तीन लग्न केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही शोधशोध सुरू केली आहे. आरोपींकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

कुणालाही सोडणार नाही

विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीसह इतर आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. तसेच या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाऊन चौकशी केली जाणार असून या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेतला जाईल, असं कल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं.

सीसीटीव्हीत काय दिसले?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

विशाल हा गेल्या वर्षापासूनच या मुलीला त्रास देत होता. त्याने गेल्यावर्षीच या मुलीला कोळसेवाडी परिसरात गाठून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या मुलीने त्याला प्रतिकार करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यावेळीही या मुलीची सुटका करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.