Crime : VIP सुरक्षा ताफ्यात बॉडीगार्ड म्हणून घुसायचा… ती गोष्ट समजली अन्… कल्याण, आंबिवली, छत्तीसगड भानगड काय?
कल्याण खडकपाडा पोलिसांना खबर मिळाली आणि त्यांनी तशा अंगाने तपास सुरू केला. पोलिसांना लागलेली खबर खरी निघाली अन्. एक मोठी भानगड समोर आली. प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी केलेल्या तपासामुळे मोठे कनेक्शन समोर आले आहे. व्हीआयपींच्या ताफ्यामध्ये बॉडीगार्ड म्हणून घुसणाऱ्या एकाबाबत पोलिसांना एक खबर लागली. पोलिसांनी संबंधित संतोष गोस्वामी याची चौकशी केल्यावर वेगळेत सत्य समोर आले. VIP सुरक्षा ताफ्यात बॉडीगार्ड जाणाऱ्या संतोष गोस्वामी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
छत्तीसगड मध्ये राहणारा संतोष गोस्वामी याने छत्तीसगड जिल्ह्यातून बंदूक रिव्होल्वर बाळगण्याचा बनावट परवाना प्राप्त केला होता. या परवान्याच्या आधारे त्याने मुंबईतील सुरक्षा एजन्सीच्या मदतीने थेट खाजगी सुरक्षा एजन्सीशी संपर्क वाढत सुरक्षा अधिकारी म्हणून स्थान मिळवले होते. कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या या तरुणाकडे असलेला परवाना बनावट असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असता त्याच्यावरील संशय बळावला.
छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवत या परवानाच्या आधारे व्हीआयपीच्या सुरक्षा ताफ्यात सहभागी होणाऱ्या तोतयाला बॉडीगार्डला कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष गोस्वामी असे या तोतया बॉडीगार्डचे नाव असून त्याच्याकडून एक 12 बोअरची बंदूक आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता त्याचा हा बनावट परवान्यांचा कारनामा समोर आला.
संतोषकडे असलेल्या परवान्याची तपासणी केली असता हा परवाना बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक 12 बोअरची बंदूक आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे या आरोपीने महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या “डी” सुरक्षा विभागात देखील काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून यांच्यासोबत अजून किती जण आहेत आणि कोणी कोणी असा बनावट सर्वांना घेतला आहे याचा तपास करत आहे.