सासूला अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव रचला आणि स्वतःच अडकला, ‘असे’ उलगडले अपहरणनाट्य

संदिपला दोन बायका आहे. त्या वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. मात्र दुसऱ्या पत्नीच्या आईला संदीप आवडत नसल्याने नेहमी या विषयावर संदिपचे आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचे वारंवार भांडण होत होते.

सासूला अडकवण्यासाठी अपहरणाचा बनाव रचला आणि स्वतःच अडकला, 'असे' उलगडले अपहरणनाट्य
अपहरणाचा बनाव करणाऱ्या जावयाला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 6:08 PM

कल्याण : सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा बनाव (Kidnapping Drama) करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेड्या (Kolsewadi Police Arrested Accuse) ठोकल्या. संदीप गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. सासूमुळे दुसरी पत्नी निघून गेली म्हणून आपल्या मित्रांसोबत कट रचत स्वतःला मारहाण (Beating Self) करून बुरखा घालून अपहरण झाल्याचं चित्र तयार करत बनाव केला होता.

कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड राहतो. संदिपला दोन बायका आहे. त्या वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. मात्र दुसऱ्या पत्नीच्या आईला संदीप आवडत नसल्याने नेहमी या विषयावर संदिपचे आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचे वारंवार भांडण होत होते.

तीन महिन्यांपूर्वी दुसरी पत्नी सोडून गेली

तीन महिन्यापूर्वी अशाच प्रकारच्या भांडणामुळे संदिपची दुसरी पत्नी संदीपला सोडून निघून गेली. त्यानंतर तिचा शोध घेऊन ती मिळत नसल्याने माझी दुसरी पत्नी तिच्या आईमुळेच निघून गेली आहे. हा राग संदिपच्या मनात होता. त्याचा राग काढण्यासाठी आणि सासूला धडा शिकविण्यासाठी त्याने हा बनाव केला.

हे सुद्धा वाचा

मारहाण करत अपहरणाचे चित्र निर्माण केले

आपल्या तीन साथीदारांसोबत संदिपने कल्याण कोळशेवाडी परिसरात आपल्या मित्रांकडून आधी मारहाण करत रस्त्यावर खरंच अपहरण होत असल्याचा चित्र तयार केले. त्यानंतर बुरखा घालून कोळशेवाडीतून पळ काढत शहापूरमधील एका गावात पाच दिवस मुक्काम ठोकला.

या दरम्यान संदिपच्या पहिल्या पत्नीने कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मात्र पोलिसांना खरंच संदिपचे अपहरण झाले असल्याचे चित्र दिसून आले.

‘असा’ उघड झाला बनाव

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या रिक्षाचा शोध काढत रिक्षा चालकाला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवत विचारपूस केली. चौकशीत त्याने हा सर्व प्रकार एक बनाव असल्याचा सांगत संदीप आणि त्याच्या मित्राची पोलखोल केली. त्यानंतर पोलिसांनी शहापूरमधून संदीप आणि त्याच्या तिन्ही मित्रांना अटक केली.

सत्य समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी बनाव करणारा संदीप गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांना ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.