Kalyan Crime : डंपरचालकाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, अवघ्या १८ तासांत ठोकल्या बेड्या

डंपरचालकाची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. ते वांद्रे स्थानकातून पळून बाहेर जात असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्यांना शिताफीने अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Kalyan Crime : डंपरचालकाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, अवघ्या १८ तासांत ठोकल्या बेड्या
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 10:50 AM

कल्याण | 28 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच दुर्गाडी पुलावर डंपरचालकाची अतिशय निर्घृणपणे हत्या (murder in kalyan) करण्यात आल्याने शहर पुन्हा हादरलं होतं. अखेर त्या इसमाच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात (accused arrested) पोलिसांना यश मिळालं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून ही हत्या नेमकी का करण्यात आली याचा तपास पोलिस करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी पुलावर सोमवारी रात्री एक डंपर खराब झाला होता. २४ वर्षीय डंपर चालक भोलाकुमारने तो डंपरला रस्त्याच्या कडेला लावून उभा केला. त्याचवेळी दोन तरूण बाईकवरून सुसाट वेगाने आणि डंपरचालक भोलाकुमार याची निर्घृण हत्या केली. मृत भोलाचा मित्र बादलकुमार माहतो, याने या हत्येची माहिती खडकपाडा पोलिसांना दिली.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात तरूणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. दुर्गाडी पूल आणि त्याच्या आसपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासायला सुरूवात केली. आणि अवघ्या १८ तासांच्या आत त्यांनी दोन्ही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. अनिस ( रा. कोनगाव) आणि लियाकत ( रा. कल्याण) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

चालकाला तो डंपर शहाडला घेऊन जायचा होता. मात्र डंपर खराब झाल्याने त्याने तो पुलावरच एका साईडला उभा केला होता. तेवढ्यात बाईकवरून दोन तरूण सुसाट वेगाने आले आणि चाकूने वार करून निर्दयीपणे ड्रायव्हर भोलाची हत्या केली. हत्येनंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, असे खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.

या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर खडकपाडा पोलिस स्टेशन आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अतिशय हुशारीने तपास करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. ही हत्या नेमकी का करण्यात आली, याचा तपासही पोलिस करत आहेत.

पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केली अटक

खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी आम्ही वेगेवगळ्या पथकांची स्थापना केली. बाजारपेठ पोलिसांचे एक पथकही आरोपींचा कसून शोध घेत होते.

हे दोन्ही आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशनवर असून ते बाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते, अशी माहिती खबऱ्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.