Kalyan Crime : कॉल करण्याच्या बहाण्याने रोखले आणि थेट फोन घेऊन पसार, स्कायवॉकवर पोलिसालाच लुटले

कायद्याचे रक्षक असलेले पोलिसही चोरांच्या तडाख्यातून वाचले नाहीत. कल्याणमध्ये एका चोरट्याने पोलिस अधिकाऱ्याला चांगलाच हिसका दाखवला. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Kalyan Crime : कॉल करण्याच्या बहाण्याने रोखले आणि थेट फोन घेऊन पसार,  स्कायवॉकवर पोलिसालाच लुटले
Image Credit source:
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 9:21 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 9 ऑक्टोबर 2023 : कल्याण-डोंबिवलीतील गुन्ह्यांच्या (crime in city) विविध घटनांनी नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या वाढत्या पहाऱ्यानंतरही गुन्ह्यांना (crime cases) काही आळा बसताना दिसत नाही. देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करून मंगळसूत्र खेचल्याची किंवा रेल्वे स्टेशनवर एका प्रवासी महिलेचा सतत पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या विकृताच्या अटकेची बातमी ताजी असतानाच, कल्याणमध्ये आता (kalyan crime) आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यालाच लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्याच्याकडून मोबाईल आणि सोन्याची चेन लुटून चोराने (theft case) पोबारा केला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे नागिरकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. कोळसेवाडी पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

फोन बंद असल्याचा केला बहाणा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप चंद्रकांत मिसर (63) हे सेवानिवृत्त अधिकारी कल्याण पूर्वेकडे चिंचपाडा रोड येथे राहतात. गेल्या आठवड्यात, गुरूवारी मध्यरात्रीच्या १.३० च्या सुमारास ते कल्याण स्टेशनवर उतरून पूर्वेकडे जाणाऱ्या स्काय वॉकवरून घरी चालले होते. गणेश मंदीर व सिध्दार्थ नगरकडे जाणाऱ्या स्कायवॉकच्या वळणावर 35 ते 40 वयोगटातील एक इसम त्यांच्याशी बोलण्यासाठी आला. माझा फोन बंद पडला आहे, घरी फोन करायचा आहे, तुमचा फोन देता का अशी विनंती त्याने मिसर यांच्याकडे केली. त्यानंतर प्रदीप मिसर यांनी त्यांचा फोन त्या इसमाला दिला. फोन नंबर डायल करण्याच्या बहाण्याने तो इसम चालत दूर जाऊ लागला.

मात्र त्याच्या हालचालींमुळे मिसर यांना संशय आला आणि त्यांनी त्या माणसाकजून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. मात्रत्या इसमाने मिसर यांचा मोबाईल खिशात टाकला व तो त्यांच्याशी झटापट करू लागला. संधी साधून त्याने मिसर यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही खेचली आणि तो चोरटा सिध्दार्थ नगरच्या दिशेने पळून फरार झाला. मिसर यांनी त्याचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. त्यानंतर प्रदीप मिसर यांनी कोळसेवाडी पोलिस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदवली. मिसर यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर पगारे पुढील तपास करत आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.