धावत्या ट्रेन मध्ये त्यानं चोरी यशस्वी केली, पण फार काळ ती पचली नाही, मोबाईल चोरीचा थरार…

ट्रेनमध्ये फोनवर बोलत असताना चोरटा मोबाईल हिसकावून पळाला. पण प्रवासी पण चिकट होता. त्यानेही शेवटपर्यंत प्रयत्न सोडला नाही. चोरटा आणि प्रवाशाचा हा थरार पाहून सर्वच हैराण झाले.

धावत्या ट्रेन मध्ये त्यानं चोरी यशस्वी केली, पण फार काळ ती पचली नाही, मोबाईल चोरीचा थरार…
कल्याणमध्ये एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरणारा अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 4:52 PM

सुनील जाधव, कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना आज उघडकीस आली आहे. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोराने खेचला आणि पळ काढला. मात्र प्रवाशाने या चोराचा पाठलाग केला. पळताना प्रवाशाला इजाही झाली आणि दुसऱ्या वेळी त्याला चोराने मारले. पण प्रवाशाने त्याचा पाठलाग सोडला नाही. अखेर प्रवाशाच्या जिद्दीमुळे हा भामटा पोलिसांच्या हाती लागलाच. आता त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. महेंद्र मारुती धुळधुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावून पळ काढला

अनिरुद्ध उमाशंकर शर्मा हे मूळचे उत्तरप्रदेश येथे राहणारे असून, मुंबईला ते चहाचा व्यवसाय करतात. उत्तर प्रदेशहून शर्मा हे पटना एक्प्रेसने मुंबईला परतत होते. यावेळी जनरल डब्यातून प्रवास करत असताना ते मोबाईलवर बोलत होते. यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांचा मोबाईल खेचला आणि तिथून पळ काढला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना शर्मा यांच्या दाढेलाही लोखंडी रॉड लागला. कल्याण रेल्वे स्थानकावर गाडी फलाटावर लागत असताना हा प्रकार घडला.

मार लागला, मार खाल्ला, पण चोरट्याचा पिच्छा सोडला नाही

ही गाडी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 05 वर थांबल्यावर तो गाडीतून आऊटरला उडी मारून पळून जात होता. यावेळी शर्मा यांनीही त्याच्या पाठीमागे उडी मारुन चोर चोर असा आरडाओरडा करायला सुरुवात केली. शर्मा यांनी त्या चोराला पकडले, त्यानंतर त्याने पुन्हा शर्मा यांना मला मारहाण केली. पुन्हा शर्मा यांनी आरडाओरडा केला. या ठिकाणी ड्युटीवरील आरपीएफ आले आणि त्यांनी मोबाईल फोन जबरीने चोरणाऱ्या इसमास पकडले.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी पोलिसांनी महेंद्र मारुती धुळधुळे याला अटक केली आहे. तो ठाणे घोडबंदर येथे राहणारा असून, त्याचे मूळ गाव यवतमाळ आहे. त्याच्या खिशात चोराला पांढऱ्या रंगाचा OPPO कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.