कल्याण : पती पत्नी आणि त्याच्या साथीदाराला घेऊन घरफोडी करणाऱ्या तिघांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेखर नटराज नायर (34), सुनिता शेखर नायर (28) असे या पती-पत्नीचे नाव आहे. तर देवेंद्र गणेश शेट्टी (23) असे त्यांच्या साथीदाराचे नाव आहे. (Kalyan Police Arrest Husband Wife and His Friend)
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 14 जानेवारीला रामबागेत राहणारे सोमनाथ सिनारे यांच्या घरी चोरी झाली होती. यावेळी चोरांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने असा 1 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना शेखर, त्याची पत्नी सुनिता आणि त्यांचा साथीदार देवेंद्र हे पोलिसांच्या जाळ्य़ात सापडले.
शेखर आणि सुनिता हे दोघेही पती पत्नी अंबरनाथ येथील शिवमंदिराजवळील कैलासनगर परिसरात राहतात. तर देवेंद्र शेट्टी हा उल्हासनगरातील मद्रासी पाड्यात राहतो. शेखर आणि देवेंद्र हे दोघेही नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन चोरीच्या ठिकाणी जायचे. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यावर दुचाकी दूरवर लावून पायी चालत जायचे.
शेखर हा खांद्याला बॅग लावून इमारतीत प्रवेश करीत असे. त्यानंतर बंद फ्लॅट आणि घराची रेकी करुन घर घेरत असे. यानंतर तो देवेंद्रला बोलावून घेत असे. यानंतर हे दोघेही घराचे कुलूप तोडून चोरी करत. चोरी झाल्यानंतर हे दोघेही रिक्षा स्टॅण्डने दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी यायचे. त्यानंतर दोघेही घरी जायचे. घरी आल्यानंतर शेखरची पत्नी सुनिता हा सर्व माल लपवून ठेवायची. त्यानंतर हा सर्व मुद्देमाल ती विकायची.
दरम्यान या चोरीच्या गुन्हयात या त्रिकूटाने वापरलेली दुचाकी, मोबाईल, टॅब असा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी दोन ठिकाणच्या घरफोडीतून लूटलेला एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Kalyan Police Arrest Husband Wife and His Friend)
संबंधित बातम्या :
‘त्या’ कारच्या शोधात कल्याण पोलिसांना कार चोरीचे गोदामच सापडलं
पत्नी सासरी परतली नाही म्हणून पतीचं टोकाचं पाऊल, संपूर्ण कुटुंबाला जिवंत पेटवलं