Kalyan Crime : वड्याचं तेल वांग्यावर ! एकीच्या प्रेमाची दुसरीला शिक्षा, एकतर्फी प्रेमातून माथेफिरूची तरूणीला मारहाण

कल्याण मध्ये हे चाललंय काय ? कधी लूटमार होते, तर कधी रेल्वे स्टेशन परिसरातून अल्पवयीन मुलीचं अपहरण. गुन्ह्यांच्या या विचित्र आणि वाढत्या घटनांमुळे घराबाहेर पडायचं की नाही, असाच प्रश्न आता कल्याणकरांना पडला आहे.

Kalyan Crime : वड्याचं तेल वांग्यावर ! एकीच्या प्रेमाची दुसरीला शिक्षा,  एकतर्फी प्रेमातून माथेफिरूची तरूणीला मारहाण
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 11:42 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 24 नोव्हेंबर 2023 : कल्याण मध्ये हे चाललंय काय ? कधी लूटमार होते, तर कधी रेल्वे स्टेशन परिसरातून अल्पवयीन मुलीचं अपहरण. गुन्ह्यांच्या या विचित्र आणि वाढत्या घटनांमुळे घराबाहेर पडायचं की नाही, असाच प्रश्न आता कल्याणकरांना पडू लागला आहे. रोज काहीतरी नवनवे, घाबरवणारे गुन्हे समोर येत आहेत, ज्यामुळे नागरिकांची मात्र भीतीने गाळण उडाली आहे. आता यातच एक नवी धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका माथेफिरूने भररस्त्यात एका तरूणीला बेदम मारहाण केली आहे. आणि त्याचं कारण काय.. ते ऐकून तर तुम्ही म्हणाल अरे देवा..!

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकतर्फी प्रेमातून तरुणीला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. त्या माथेफिरेन वड्याचं तेल वांग्यावर काढत त्या तरूणाल मारलं. म्हणजे काय ? या माथेफिरू आरोपीचे एका तरूणीवर प्रेम होते, मात्र तिने त्याच्याशी बोलायला, लग्न करायला नकार दिला. यामुळे तो एवढा संतापल की रागाच्या भरात त्याने त्या तरूणीच्या बहिणीला, हो बहिणीला भर रस्त्यात अडवून धमकी दिली आणि मारहाणही केली. ‘ मी तुझ्या बहिणीवर प्रेम करतो, तिला माझ्याशी लग्न करायला सांग’ असे सांगत त्या तरूणीला, भररस्त्यात सर्वांसोमरच बेदम मारलं. त्या तरूणीने कसाबसा जीव वाचवत पळ काढला. तिने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत हेमंत गमरे नावाच्या आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे .

पाठलाग करत थांबवलं आणि दिली धमकी, नंतर मात्र…

मारहाण करण्यात आलेली पीडित तरूणी ही कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरात रस्त्याने जात होती. तेव्हा आरोपी हेमंत गमरे याने तिचा पाठलाग करत तिला भररस्त्याचत अडवलं. ‘ माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, ती माझ्याशी बोलत नाही. तिला माझ्याशी लग्न करायला सांग’ अशी धमकी त्याने तिला दिली. मात्र हे सगळं ऐकून ती मुलगी घाबरली, आणि काहीही न बोलता पुढे चालू लागली. त्यामुळे तो आणखीनच संतापला आणि त्याने पुन्हा तिचा पाठलाग करून थांबवत, भररस्त्यातच तिला मारायला सुरूवात केली. एवढेच नव्हे तर तिला बेदम दिल्यानंतर आरोपी हेमत गमरे याने त्या तरूणीच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि तो पळू गेला. घाबरलेल्या तरूणीने कसेबसे घर गाठले. नंतर तिने धीर एकवटून कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारहाण आणि धमकी प्रकरणी तक्रार नोंदवली.

त्या आधआरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी आरोपी हेमंत गमरे याला बेड्या ठोकून अटक केली. चौकशीदरम्याने, त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. सध्या पोलिस पुढचा तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.