Kalyan Crime | इराणी गल्लीत प्रचंड गोंधळ, महिलांचा विरोध, कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

कल्याणच्या इराणी वस्तीत महिलांच्या गोंधळात या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेतील आंबिवली परिसरातील इराणी वस्ती म्हणजे चोरटय़ांचा (Thief) अड्डा आहे. देशभरातील अनेक गुन्ह्यातील आरोपी या वस्तीत राहतात.

Kalyan Crime | इराणी गल्लीत प्रचंड गोंधळ, महिलांचा विरोध, कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या
पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:01 PM

ठाणे : देशभरातील 20 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात (Chain Snatching) पाच वर्षांपासून फरार असलेला तसेच मोक्का अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हसनैन सय्यद याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. कल्याणच्या इराणी वस्तीत महिलांच्या गोंधळात या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेतील आंबिवली परिसरातील इराणी वस्ती म्हणजे चोरटय़ांचा (Thief) अड्डा आहे. देशभरातील अनेक गुन्ह्यातील आरोपी या वस्तीत राहतात. अनेकदा पोलिसांनी या वस्तीत छापा टाकून कोंबिंग ऑपरेशन केले आहे. सय्यद यालादेखील पोलिसांनी येथेच बेड्या ठोकल्या आहेत.

इराणी गल्लीत जाऊन पोलिसांनी हसनैनला ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांच्या पथकाला हसनैन सय्यद हा पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी या वस्तीत वास्तव्य करुन असल्याची माहिती मिळाली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस पकडण्यासाठी सापळा रचला. तसेच ठरलेल्या नियोजना प्रमाणे पोलिसांनी येथे छापा टाकला. तसेच हसनैन याला बेड्या ठोकल्या.

हसनैन 20 गुन्ह्यात होता फरार 

छाप्यादरम्यान हसनैन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. मात्र इराणी वस्तीतील महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांसोबत झटापटी झाली. पोलिसांनी हसनैन सय्यदला पोलिसांच्या गाडीत टाकले. त्याला घेऊन थेट मानपाडा पोलीस गाठले. हसनैन सय्यद हा देशात चैन स्नॅचिंगचा मोठा गुन्हेगार मानला जातो. 20 गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरोधात मोकाही लावण्यात आला आहे. पाच वर्षानंतर हसनैनला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा काही माल हस्तगत केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

इराणी गल्ली म्हणजे आरोपींची वस्ती 

दरम्यान, जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी पोलीस इराणी वस्तीत जातात तेव्हा आरोपींचे नातवाईक नातेवाईक आणि वस्तीतील लोक पोलिसांशी नेहमी वाद घालतात. महिलांना पुढे करुन पोलिसांवर दगडफेक करणे, गाडी अडवीणे, आरोपीला पळवून जाण्यास मदत करणे, अशी या वस्तीतील लोकांची मोडस अॅप्रेंटी आहे. यामध्ये अनेक वेळा पोलीस जखमीही झालेले आहेत. 2008 साली तर पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी गोळीबार करावा लागला होता. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

इतर बातम्या :

स्वर्णव सापडल्याच्या आनंदात भेटायला येत असलेल्या आत्यावर काळाचा घाला ; अपघातात आत्याचा मृत्यू ; मुले गंभीर जखमी

Chandrapur | कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणीकडे मागावी?, ब्रम्हपुरीत पोलीस शिपायाचा विवाहितेवर अत्याचार

तीन लाख घेतले, आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी त्याने इतरांना खोलीबाहेर काढले, औरंगाबादेत भोंदू हकिमाला बेड्या!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.