सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 4 डिसेंबर 2023 : कल्याण पश्चिमेकडे एका विकासकाच्या बंद ऑफीसवर आणि घरावर दरोडा टाकण्यात आल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र त्या दरोडेखोरांचा आता शोध लागला असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या इसमाचा ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकानेच साथीदारासह कट रचून हा दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुंडलिक चंद्रकांत वाघे, स्वप्नील संतोष पाटील, बलवंत कबीरदास वेलेकर, रामायण बलजोर यादव अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी एक त्या विकासकाचा ड्रायव्हर असून दुसरा त्याच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
त्या दोघांनीच चोरीचा हा कट रचला. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्यावर कोणीही संशय घेऊ नये म्हणून त्यांनी रात्री चोरी केली. तसेच त्यानंतर त्यांचा साथीदार असलेल्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली. त्यला चाकूचा धाक दाखवतच हा दरोडा टाकला. याप्रकरणी विकासकाने तक्रार दाखल केल्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी तपास करत या चार आरोपींना बेड्या ठोकल्या. आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत संजय गुप्ता नावाचे प्रसिद्ध विकासक राहतात. त्यांच्याकडे बलवंत कबीरदास वेलेकर हे ड्रायव्हर म्हणून तर रामायण बलजोर यादव हे वॉचमन म्हणून काम करतात. दिवाळीत गुप्ता यांनी व्यवहारासाठी बरीच रक्कम आणून ऑफीसमध्ये ठेवल्याची शंका त्या दोघांना आली. त्यांनी इतर साथीदारासह दरोडा टाकण्याचा प्लान रचला. नेहमीप्रमाणे वॉचमन आपलं नियमित काम करत त्याच्या जागी बसला आणि ड्रायव्हरने आपल्या चार साथीदार सह कार्यालयावरती दरोडा टाकला. त्यावेळी त्यांनी ठरल्याप्रमाणे वॉचमनला मरहाण करून, त्याचे हातपाय बांधले आणि कार्यालयाचा दरवाजा तोडत आज मध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आतमध्ये काहीच न सापडल्याने ते निराश होऊन परत गेले.
दुसऱ्या दिवशी गुप्ता ऑफीसला आले तेव्हा दरवाजा तुटलेला पाहून त्यांनी वॉचमनकडे चौकशी केली असता, काही दरोडेखोरांनी आपल्याला मारहाण करून, बांधून चोरीचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. हे समजताच गुप्ता यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी क्राइम, प्रदीप पाटील यांनी पीएसआय तानाजी वाघ, पीएसआय भिसे पोलीस हवालदार चित्ते , पोलीस नाईक सूर्यवंशी , रामेश्वर गामणे , थोरात , कागरे , वडगावे अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
या दरम्यान पोलिसांनी चौकशी करत निमगाव परिसरातील एका आरोपीला ताब्यात घेतले व त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच त्या विकासकाचा ड्रायव्हर आणि वॉचमनच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर पोलिसांनी गुप्ता यांचा ड्रायव्हर, वॉचमन यांसह आणखी दोघांना अटक केली तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू केला.
दाखवतात त्यांनी विकासाचे ड्रायव्हर आणि वाचण्याच्या मदतीने हा दरोडा टाकण्याचं पोलिसाला सांगितले यानंतर पोलिसांनी या प्रकारनी वाचमेन , ड्रायव्हर व इतर दोन असे चार जणांना ताब्यात घेत त्यांच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे.