आधी गोड बोलून निर्जन स्थळी नेले, नंतर चाकूचा धाक दाखवत पैशांची लूट, 2 तरुणांना अवघ्या 18 तासांत बेड्या
प्रवाशांना भूलथापा देत त्यांची लूट करणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली. चाकूचा धाक दाखवत या दोन आरोपींनी एका प्रवाशाची लूट केली होती.
ठाणे : प्रवाशांना भूलथापा देत त्यांची लूट करणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली. चाकूचा धाक दाखवत या दोन आरोपींनी एका प्रवाशाची लूट केली होती. आरोपींनी प्रवाशाकडून रोख पैसे तसेच काही वस्तू लूटल्या होत्या. ही लूट करुन नंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोबारा केलेल्या या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या 18 तासात अटक केली आहे. नदीम शहा आणि मुकेश पिंपळीसकर अशी आरोपींची नावे आहेत. (Kalyan Railway Crime Branch arrested two accused for misleading and robbing passengers)
आरोपींच्या प्रवाशाला भूलथापा
मिळालेल्या माहितीनुसार शिवकुमार यादव नावाच्या तरुणाला बिहारला जायचे होते. तो रेल्वेने प्रवास करण्यासाठी शुक्रवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आला होता. हा तरुण तिकीट बुकिंग ऑफिसच्या बाजूला उभा असताना त्याला दोन तरुण भेटले. या तरुणांनी “तू आमच्या सोबत विद्याविहारला चल तिथून गाडीत बसायला जागा मिळेल. त्यानंतर गावी निघून जाऊ,” असे शिवकुमारला सांगितले.
चाकूचा धाक दाखवत रोकड तसेच सामान पळवले
तरुणांच्या या भुलथापांना शिवकुमार यादव बळी पडला. त्यानंतर शिवकुमार या दोन तरुणांसोबत विद्याविहारला गेला. येथे तरुणांनी शिवकुमारला निजर्न स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवला. तसेच त्याच्याकडील रोकड आणि वस्तू हिसकावल्या. ही लूट करुन दोन्ही तरुण घटनास्थळावरुन पळून गेले. या प्रकरणी लूट झालेला तरुण शिवकुमार याने कल्याण येथे रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने 18 तासाच्या आत सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
अवघ्या 18 तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केलं
याविषयी बोलताना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अरशद शेख यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या सहाय्याने आमच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींना नवापाडा येथून अटक केली आहे. यातील आरोपी नदीमने एप्रिल महिन्यात असे एकाला लूटले होते. या दोघांनी आणखी किती जणांना लूटले आहे, याचा तपास सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्रवाशांना भूलथापा देऊन त्यांची लूट करणाऱ्या एका टोळीस अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आता या दोन तरुणांना अटक केली आहे.
इतर बातम्या :
चाकू, तलवारी, रायफल, अन् बंदुका, अवैध शस्त्रांचं मोठं घबाड, भुसावळमध्ये पोलिसांची धडक कारवाई
आधी गळा आवळला नंतर पोत्यात भरलं, प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी तिनं पतीला संपवलं, चंद्रपूर हादरलं
बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या
(Kalyan Railway Crime Branch arrested two accused for misleading and robbing passengers)