रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीच्या कुटुंबीयांना तीन शब्दांवरुन शोधलं, कल्याण पोलिसांची कमाल

वाशीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणीच्या आई वडिलांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या तीन शब्दांच्या साहाय्याने शोधून काढले आहे. Kalyan Railway Police

रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीच्या कुटुंबीयांना तीन शब्दांवरुन शोधलं, कल्याण पोलिसांची कमाल
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 4:53 PM

कल्याण: वाशीमध्ये मंगळवारी सकाळी  21 वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत सापडली होती ती अद्याप बेशुद्ध आहे. मात्र, 16 तासानंतर या तरुणीच्या आई वडिलांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या तीन शब्दांच्या साहाय्याने शोधून काढले आहे. मुंबईत कामाला असलेली ही तरुणी वाशीत कशी पोहचली. तिला कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याचा तपास वाशी जीआरपी करत आहे. (Kalyan Railway Police found injured lady family on only three words)

मंगळवारी सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी ब्रीज जवळ रेल्वे ट्रकच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी पडली असल्याची माहिती वाशी जीआरपीला मिळाली. वाशी रेल्वे पोलिसांनी त्वरीत या जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तरुणी अधर्वट बेशुद्ध अवस्थेत ही तरुणी तिचे नाव ,आईचे नाव आणि टिटवाळा हे तीन शब्द उच्चारीत होती.

तरुणीच्या कुटुंबाला 16 तासात शोधले

रेल्वे पोलिसांसमोर यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले होते. टिटवाळा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. कल्याण रेल्वे पोलिसांना (Kalyan Railway Police)  पत्ता व वारस शोधण्याची जबाबदारी दिली गेली. रेल्वे पोलीस मंगळवारी चार वाजता टिटवाळ्यात पोहचले. संपूर्ण टिटवाळा पिंजून काढला. 16 तासानंतर कल्याण जीआरपीला यश आले. तरुणीचे आई वडिलांना बुधवारी सकाळी दहा वाजता पोलिसांनी शोधून काढले.

पोलिसांच्या माहितीनुसार ही तरुणीचे आई वडिल टिटवाळ्यात राहतात. ती तरुणी पवईला एका उच्चभ्र सोसायटीतील घरात घर काम करते. ती आठवड्यातून केवळ एक दोन दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी टिटवाळ्यात येते. ही तरुणी वाशीला कशी पोहचली.  तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला आहे याचा तपास सुरू आहे. वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णून केसरकर यांनी सांगीतले. त

तरुणी अद्याप बेशुद्ध आहे. जोर्पयत ती शुद्धीवर येत नाही. तोर्पयत या प्रकरणी काही बोलणे योग्य नाही. आमच्या पद्धतीने तपास सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या:

भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागला, दुचाकीस्वरांकडून 15 वर्षीय मुलाची हत्या

‘नगर जिल्ह्यात दरोड्यांच्या आणि बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ’, निलम गोऱ्हे यांचं पोलीस महानिरीक्षकांना पत्र

(Kalyan Railway Police found injured lady family on only three words)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.