तीन महिन्यापुर्वी दुसरं लग्न, पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, कारण समजल्यानंतर सगळ्यांनी…
रंजीता शेट्टी असे पत्नीचे नाव असून तीन महिन्या पूर्वी शशिकांत शेट्टी यांच्या सोबत झाले होते. पतीसोबत भांडण होत असल्याने दोन दिवसापूर्वी रंजीता शहाड मध्ये आईकडे राहण्यास आली होती.
सुनिल जाधव, कल्याण : कल्याण पश्चिमेतील शहाड (kalyan shahad) परिसरात पत्नी कामावर जात असल्याचा राग मनात धरून एका 45 वर्षीय पतीने आपल्या पत्नीवर भर रस्त्यात चाकूने सहा ते सात वार केल्याची घटना घडली आहे. रंजीता शेट्टी असे जखमी पत्नीचे नाव असून शशिकांत शेट्टी (shashikant shetty) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. सध्या गंभीर जखमी अवस्थेत पत्नी रंजितावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून कल्याणच्या महात्मा फुले पोलीस (kalyan police) ठाण्यात गुन्हा दाखल कराची प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण पश्चिम शहाड परिसरात राहणारी 35 वर्षीय रंजीता हिने कल्याण वायले नगरमध्ये राहणाऱ्या शशिकांत शेट्टी याच्या सोबत तीन महिन्यापूर्वी दुसरा विवाह केला. रंजीता ही मुंबईमधील एका कंपनीमध्ये काम करत असून शशिकांत हा कल्याण पश्चिमेमधील वायले नगर परिसरातच आईस्क्रीमचं दुकान चालवतो. लग्नानंतर रंजीता कामावर जाण्याच्या कारणावरून शशिकांत नेहमी वाद घातलं होता अश्याच प्रकारे गेल्या तीन दिवसांपूर्वी दोघात मोठ्या प्रमाणात वाद झाला. त्यानंतर त्रस्त झालेली रंजीताने शशिकांत घर सोडून शहाड परिसरात राहणाऱ्या आपल्या आईच्या घरात राहण्यास गेली.
आईकडे आल्यानंतरही रंजिता कामावर जात असल्याने संतापलेल्या पती शशिकांतने आज पहाटे सात वाजेच्या सुमारास रंजिता कामावर जात असताना शहाड परिसरात तिला थांबवून तिच्या पाठीवर हातावर गळ्यावर छातीवरचाकूने सहा ते सात वार करून तो फरार झाला. परिसरातील काही नागरिकांनी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रंजिताला उपचारासाठी रुग्णालय दाखल केले. सध्या रंजीताची प्रकृती गंभीर असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस चौक पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून दोन पथक तयार करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.