Kalyan Crime : मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती पण पोहोचलीच नाही, चोरट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

मुलीला शाळेत आणायला जाणाऱ्या महिलेच्या अंगावरील चेन आणि मंगळसूत्र खेचण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करताच त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Kalyan Crime : मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती पण पोहोचलीच नाही, चोरट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 11:20 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 18 ऑक्टोबर 2023 : कल्याण – डोंबिवलीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांवर होणारे हल्लेही बरेच वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दागिने खेचण्याच्या आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच आत शहरात असाच आणखी एक गुन्हा घडला आहे.

मुलीला शाळेत आणायला जाणाऱ्या महिलेच्या अंगावरील चेन आणि मंगळसूत्र खेचण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करताच त्याने तिचा गळा, हात, मानेवर शस्त्राने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडितवर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुलीला शाळेत आणायला गेली पण …

राहणाऱ्या महिलेवर चोरट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळेतून सुटलेल्या मुलीला आणण्यासाठी निघालेल्या या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने वार करून तिला जखमी केले.

कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रिया सावंत असे पीडित महिलेचे नाव आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मंगळवारी सकाळच्या सुमारास तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात होती. त्यावेळी ती फोनवर बोलत होती. मात्र मोहन कॉलनी ऑफीसर क्वॉर्सजवळ आल्यानंतर एका अज्ञात इसम अचानक तिच्या मागून आला. त्याने त्या महिलेच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेने त्याला रोखत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

पकडले जाण्याच्या भीतीमुळे त्या चोराने धारधार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. तिचा गळा, हात, पोट, मान आणि पाठीवर वार झाल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. हे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत त्या महिलेला उचलून दवाखान्यात नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर महिलेचा पतीही तिथे आला. पुढील उपचारांसाठी तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन् दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.