चारकोपमध्ये साई मंदिराला आग लागली नाही, लावली; हत्याप्रकरणाचा धक्कादायक उलगडा
कुलरच्या स्फोटामुळे एवढी मोठी आग लागू शकत नाही, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. | Fire in Charkop Saibaba Temple
मुंबई: चारकोपच्या पाखाडी रोड परिसरातील साई मंदिरात रविवारी लागलेली आग ही हत्येच्या उद्देशाने जाणुनबुजून लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत तीन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला होता. जुन्या भांडणाचा आणि मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी भावेश चांदोरकर याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने या तिघांना पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले. (2 held for dousing 3 in petrol setting them ablaze at Charkop temple)
पोलिसांनी भावेश चांदोरकर याला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने आपणच ही आग लावल्याची कबुली दिली. या आगीत सुभाष खोडे, युवराज पवार आणि मन्नू गुप्ता या तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. यापैकी युवराज पवार याने दीड वर्षापूर्वी क्रिकेट खेळण्याच्या वादातून आरोपी भावेश चांदोरकरला मारहाण केली होती. त्यानंतरही युवराज पवार हा भावेशला अधुनमधून शिवीगाळ आणि मारहाण करायचा.
काही दिवसांपूर्वी भावेश सिगारेट पीत असताना युवराज पवारने त्याला हटकले होते. पवारने त्याला सिगारेट आणायला सांगितले. त्यावर भावेशने मी तुझ्या बापाचा नोकर नाही, असे उलट दिले. तेव्हाही युवराज पवारने भावेशला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या भावेशने युवराजला जिवंत जाळायचे ठरवले. त्यानुसार भावेशन युवराज आणि त्याचे मित्र मंदिरात झोपले असताना पेट्रोल ओतून संपूर्ण परिसर पेटवून दिला. यामध्ये युवराज पवारसह आणखी दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
वॉटर आणि एअर कुलरमुळे स्फोट झाल्याचा गैरसमज
सुरुवातीला पोलिसांना मंदिरातील वॉटर आणि एअर कुलरमुळे स्फोट झाल्याचे वाटले होते. न्यायवैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाकडून त्याअनुषंगाने प्राथमिक अहवाल हाती मिळाल्यानंतर यामध्ये काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. कुलरच्या स्फोटामुळे एवढी मोठी आग लागू शकत नाही, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे होते.
त्यामुळे पोलिसांनी अधिक खोलवर जाऊन तपास केला असता पोलिसांना भावेश चांदोरकर आणि युवराज पवारमधील वादाची माहिती मिळाली.
भावेश आगीच्या घटनेपासून गायब होता. परिसरातील खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांवरून औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे असलेल्या भावेशला पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा भावेशने आपणच या तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. भावेशने त्याच्या स्कुटीमधील पाच लीटर पेट्रोल एका कॅनमध्ये भरून ठेवले होते. हे पेट्रोल त्याने मंदिरात टाकून आग लावून दिली होती.
इतर बातम्या:
आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली
आधी हवेत गोळीबार, नंतर डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये थरार
(2 held for dousing 3 in petrol setting them ablaze at Charkop temple)