नवरा गेल्यावर तिचा प्रियकर घरी यायचा! पतीसह आता सासऱ्यांनाही सुनेनं संपवलं
प्रियकर, प्रॉपर्टी आणि पत्नीचं सनसनाटी कृत्य! नेमकी कुठे घडली दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना?
उत्तर प्रदेश : कानपूरमध्ये एका महिलेनं आपल्याच पतीची आणि सासऱ्यांची हत्या केली. प्रियकर आणि प्रॉपर्टीसाठी फिल्मी स्टाईलने सपना नावाच्या महिलेनं हे धक्कादायक कृत्य केलं. विशेष म्हणजे सपनाला टीव्ही सीरिअल पाहूनच हत्या कशी करायची, हे सुचलं होतं. तिने आपल्या पतीला आणि सासऱ्यांना औषधांचा ओव्हरडोस देऊन मारुन टाकलं. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सपनासह तिचा प्रियकर राज आणि अन्य चौघा जणांना अटक केली आहे.
सपनाचा पती ऋषभ याच्यावर आधी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला सपनाच्या प्रियकराने केला होता. सपनानेच हा हल्ला घडवून आणलेला.
पण हल्ल्यातून बचावलेल्या ऋषभला सपनाने औषधांचा ओव्हरडोस दिला आणि त्यातच ऋषभचा मृत्यू झाला. ऋषभला डायबेटीसचा त्रास होता. त्याला ग्लुकोज इंजेक्शनही दिलं होता होतं, अशी माहिती समोर आली आहे.
जेव्हा ऋषभ घरी नसायचा तेव्हा सपना आपल्या प्रियकराला घरी बोलावून घ्यायची, असं ऋषभच्या मावशीनं पोलिसांना सांगितलंय. अत्यंत चतुराईने सपना नावाच्या महिलेनं हे हत्याकांड रचलं. वारंवार सपनाचा प्रियकर राज हा घरी कुणी नसताना तिला भेटायला येत होता.
पोलिसांना कळू नये, यासाठी सपना हिने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांत पतीवर हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनाही शेजारी राहणाऱ्या एका महिलेल्या भावाला ताब्यातही घेतलं. पण त्याचा या हल्ल्याशी काहीच संबंध नव्हता. प्रियकराला वाचवण्यासाठी तिने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला होता.
प्रियकराला वाचवण्यासाठी स्वतःच पोलिसात तक्रार दिली. आणि दुसरीकडे स्वतःच पतीला संपवण्याचा घाटही घातला. शेजारी राहणाऱ्या विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीसोबत सपनाचा वाद होता. आर्थिक कारणावरुन सुरु असलेल्या वादातूनच सपनाने खोटा एफआयआर नोंदवला.
आधी सपनाने माझ्या भावाची हत्या आणि नंतर माझ्या मुलाचाही जीव घेतला, असं ऋषभच्या मावशीने सांगितलं. ती मेडिकलमधून औषधं घेऊन यायची. औषधांचा ओव्हरडोस देऊन तिने हे दुहेरी हत्याकांड केल्याचा आरोप केला जातो आहे. ऋषभ हा खरंतर अनाथ होता. किशोर यांनी ऋषभला दत्तक घेतलं होतं. एका आश्रमातून ते ऋषभला घेऊन आले होते.
दरम्यान, वडील आणि मुलाच्या हत्येमागे घरातील सूनच असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी फक्त सुनेलाच नव्हे तर तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतलंय. तसंच ज्या मेडिकलमधून ती औषधं आणत होती, त्या मेडिकलच्या मालकालाही अटक कऱण्यात आली आहे. याप्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही जणांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरु आहे. अधिक तपास कानपूर पोलिसांकडून केला जातोय.