ब्लेडने तरुणीच्या छातीवर नाव लिहित अत्याचार, अश्लिल व्हिडीओ तयार केला आणि…
एका मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला आहे. इतकंच त्या मुलीच्या छातीवर ब्लेडने नाव कोरलं होतं. तसेच अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत होता.
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली भागात एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याच भागातील एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर अत्याचार केले. इतकंच नाही तर ब्लेडने तिच्या छातीवर आपलं नाव लिहित धमकी दिली. जर घरून पैसे आणून दिले नाही तर ब्लेडने तिचा गळा कापेल अशी धमकी दिली. त्याचबरोबर अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा भीतीही घातली.
धमकीमुळे मुलगी पुरती घाबरून गेली. वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी साडे दहा लाख रुपयांची रक्कम जमा करून ठेवली हीती. तिने घरातून साडे दहा रुपये हळूहळू करत महिन्याच्या आत आरोपीला दिले. कपाटात पैसे नसल्याचे पाहून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर घरात एक गोंधळ उडाला. वडिलांनी घरातील प्रत्येकाची झाडाझडती घेतली. त्यानंतर मुलीला विचारल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.
मुलीने घडला प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना दिलेल्या मााहितीत मुलीने सांगितलं की, अमन नावाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्याने अत्याचार केले. तसेच ब्लॅकमेल करत आईचं मंगळसूत्र मागितलं.
आईचं मंगळसूत्र चोरी मुलीने अमनला दिलं. त्यानंतर तो तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
व्हिडीओ व्हायरल करेल या भीतीपोटी तिने घरात ठेवलेले साडे दहा लाख रुपये थोडे थोडे करून आरोपीला दिला.या संपूर्ण प्रकरणात अमनच्या मित्रांचाही सहभाग होता.
पोलिसांनी पीडित तरुणीच्या सांगण्यावरुन आरोपी अमन आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमन फरार असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी टीम तयार केली आहे.