1-2 नव्हे, तब्बल 8 लग्नं केली अन् जेलमध्ये गेली, तिथेही रचला विवाह ! कोण आहे ती ?

शादी का लड्डू जो खाए पछताए, जो ना खाएं वो ललचाए.. असं म्हटलं जातं. पण पंजाबच्या कपुरतळा येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. तेथे 8 वेळा लग्न केलेली एक महिला जेलमध्ये गेली आणि तिने तुरूंगातच 9 वं लग्न देखील केलं.

1-2 नव्हे, तब्बल 8 लग्नं केली अन् जेलमध्ये गेली, तिथेही रचला विवाह ! कोण आहे ती ?
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 3:31 PM

शादी का लड्डू जो खाए पछताए, जो ना खाएं वो ललचाए.. असं म्हटलं जातं. पण पंजाबच्या कपुरतळा येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. तेथे 8 वेळा लग्न केलेली एक महिला जेलमध्ये गेली आणि तिने तुरूंगातच 9 वं लग्न देखील केली. 8 लग्न केल्याच्या आरोपाखाली ही महिला जेलमध्ये आहे. मात्र तिथेच आणखी एकाशी तिने लग्न केलं . याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलिस याचा तपास करत आहेत.

या आरोपी महिलेविरोधात याआधीच 8 लग्नांचे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याच कारणामुळे ती कपूरतला तुरुंगात कैद आहे. मात्र तिथे जाऊनही तिला काहीच फरक पडलेला नाही. ममिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात असतानाही त्या महिलेने एका तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी लग्न केले. त्यामुळे हे तिचं 9 वं लग्न आहे. तिने ज्याच्याशी जेलमध्ये लग्न केलं, तो युवकही आधीपासूनच विवाहीत होता. याप्रकरणी त्या युवकाच्या पहिल्या पत्नीने पुढे येऊन पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली.

काय म्हणाली त्या युवकाची पत्नी ?

आपल्या पतीचं जेलमध्ये दुसरं लग्न झाल्याचं तरुणाच्या पहिल्या पत्नीला समजताच तिने ताबडतोब अमृतसर येथील पोलिसांत धाव घेतली. पीडितेने या प्रकरणाबाबत पोलिसांकडे न्याय मागितला असून त्यासाठी अर्जही लिहिला आहे. तिचा नवरा कपूरतळा तुरुंगात कैद आहे. तेथेच कैद असलेल्या एका महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी लग्न केले, असे त्या युवकाच्या पहिल्या पत्नीने सांगितलं.

तिच्या नवऱ्याचं ज्या महिलेशी लग्न झालं ती आधीच विवाहित आहे. एवढंच नव्हे तर तिने यापूर्वी 8 लग्ने केली आहेत, यासाठीच ती तुरुंगात गेली होती. आरोपी महिलेने पीडित महिलेच्या पतीसोबत 9वं लग्न केलं. आणि आता आरोपी महिला तिच्या पतीला त्रास देत आहे, असे पीडित महिलेने सांगितले. यामुळे, तिने आता अमृतसर पोलिसांकडे जाऊन हा सर्व प्रकार कथन करत बाजू मांडली. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही तिने केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.