नाटकाच्या सरावादरम्यान एकटे असताना असं कधीच करु नका…

भगतसिंह यांच्या फाशीच्या शिक्षेची घटना नाटकात साकारली जाणार होती, पण सरावादरम्यान घडला अनर्थ!

नाटकाच्या सरावादरम्यान एकटे असताना असं कधीच करु नका...
सुजय गोवडा, मृत विद्यार्थीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 1:07 PM

कर्नाटक : एका 12 वर्षांच्या मुलाचा नाटकाच्या सरावादरम्यान मृत्यू झाला. हा मुलगा शहीद भगतसिंह (Bhagat Singh) यांच्या फाशीच्या शिक्षेचा नाटकातील प्रसंगाचा सराव घरात करत होता. यावेळी या मुलाच्या घरात कुणीही नव्हतं. सराव करतेवेळी अचानक हा विद्यार्थ्याला गळफास बसला आणि त्यातच त्याचा जीवही गेला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. कर्नाटकच्या (Karnataka) चित्रदूर्गमध्ये  (Chitradurga) ही घटना घडलीय.

मंगळवारी सादर केल्या जाणाऱ्या एका नाटकात हा विद्यार्थी भगतसिंग यांची भूमिका साकारणार होता. या नाटकाचा सराव हा विद्यार्थी घरी करत होता. त्यावेळी घरी तो एकटाच होता.

कन्नड राज्योत्सव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एक नाटक सादर केलं होतं. त्या नाटकातील सुजय गोवडा नावाचा सातवीतील विद्यार्थी भगतसिंह यांची भूमिका साकारणार होता.

हे सुद्धा वाचा

सुजय याचे आईवडील एक चहाची टपरी चालवतात. सुजय एका खासगी शाळेत शिकत होता. चित्रदुर्ग येथील शाळेत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

भगतसिंह यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. नाटकातील याच प्रसंगाचा सराव करत असताना सुजय याला गळफास बसला. घरात कुणीच नसल्याने कुणी त्याच्या मदतीलाही येऊ शकलं नाही. दरम्यान, काही वेळाने जेव्हा सुजयची आई घरी आली, तेव्हा कुणीच घरात दार का उघडत नाही, असा प्रश्न तिला पडला.

दरम्यान, शेजाऱ्यांनीही मदत केली. अखेर घराचा दरवाजा तोडून जेव्हा आई आतमध्ये गेली. तेव्हा मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहून ती हादरली. घरच्या पंख्याला सुजयचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

त्याला तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी आता पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटकाच्या सरावादरम्यान भगतसिंह यांची भूमिका साकारणाऱ्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनैसर्गिक मृत्यूची नोंद या घटनेबाबत करण्यात आली असून अधिक तपास केला जात असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.