Bus Accident | 60 प्रवाशांसह खचाखच भरलेली बस उलटली, आठ जणांचा जागीच मृत्यू

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडला त्या क्षणी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि त्यात बहुतांश विद्यार्थी प्रवास करत होते. 20 प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus Accident | 60 प्रवाशांसह खचाखच भरलेली बस उलटली, आठ जणांचा जागीच मृत्यू
कर्नाटकात बस उलटून भीषण अपघातImage Credit source: एएनआय
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 1:40 PM

तुमकुर : कर्नाटकात झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात (Tumkur Karnataka) पावगडजवळ खासगी बस उलटून अपघात झाला होता. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली, असे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 60 प्रवासी होते.

अपघातग्रस्त बसचे फोटो :

नेमकं काय घडलं?

कर्नाटकात झालेल्या भीषण बस अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात पावगडजवळ खासगी बस उलटून शनिवारी सकाळी अपघात झाला.

अपघातानंतर काही प्रवासी उलटलेल्या बसमध्येच अडकून पडले होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रवाशांनी भरलेली बस उलटली

अपघाताच्या वेळी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार बसमध्ये जवळपास साठ जण असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

20 जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

 गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात, 3 जण जागेवरच ठार

पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी

नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.