चिकन करीचा बेत होता पण खाता खाता झाला राडा, बाप थेट तुरुंगातच गेला; नेमकं काय घडलं?

घरी चिकन करीचा बेत होता. चिकन करी कुटुंबातील स्रव सदस्यांनी खाल्ली. पण वडिलांसाठी चिकन करी राहिली नाही. वडिल घरी आल्यानंतर यावरुन वाद झाला, मग पुढे अनर्थच घडला.

चिकन करीचा बेत होता पण खाता खाता झाला राडा, बाप थेट तुरुंगातच गेला; नेमकं काय घडलं?
चिकन करीसाठी बापाने मुलाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 10:43 AM

मंगलोर : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. चिकन करी मिळाली नाही म्हणून बापाने मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शिवराम असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवरामच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. शीना असे आरोपी बापाचे नाव आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथे ही घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

चिकन करी मिळाली नाही म्हणून संतापला

शीना याच्या घरी मंगळवारी चिकन करीचा बेत होता. यावेळी शीना बाहेर गेला होता. शीना घरी परत आला तेव्हा कुटुंबीयांनी चिकन करी संपवली होती. शीनाला चिकन करी शिल्ल्क राहिली नव्हती. यामुळे शीना संतापला. त्याने मुलगा शिवरामशी याबाबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेली की, शीनाने शिवरामला लाडकी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

गंभीर जखमी मुलाचा जागीच मृत्यू

या मारहाणीत शिवराम गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे दोन मुले आपल्या बापाच्या प्रेमाला पारखी झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.