प्रेमाचा असाही एक त्रिकोण…! नवरा, बायको आणि बायकोचा बॉयफ्रेन्ड

लग्नानंतर प्रियकरासोबत फरार झाली बायको, नवऱ्याला फोटो पाठवून कळवलं! त्याने काय रिप्लाय दिला?

प्रेमाचा असाही एक त्रिकोण...! नवरा, बायको आणि बायकोचा बॉयफ्रेन्ड
तब्बल 12 वर्षांनंतर पत्नी जिवंत सापडलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 5:25 PM

कर्नाटक : म्हैसूर जिल्ह्यातील एक विवाहित महिला (Married women) आपल्या प्रियकरासोबत (Boy friend) घरातून पळून गेली. त्यानंतर तिने आपल्या पतीला प्रियकरासोबतचे फोटो पाठवले आणि याबाबतची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे बायकोचे तिच्या प्रियकरासोबतचे फोटो पाहून निराश झालेल्या पतीने आत्महत्या (Karnataka Suicide) केलीय. या घटनेनंतर आता बायकोविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पुढील तपास सुरु आहे. रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

म्हैसूर जिल्ह्यातील हूनसूर मध्ये प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेचा पती निराश झाला होता. कहर म्हणजे पत्नीने जेव्हा तिचे प्रियकरासोबत पळून गेलेल्या फोटो पतीला पाठवले, त्यानंतर तो अधिकच खचला. नैराश्य आलेल्या पतीने आपल्या राहत्या घरातच आत्महत्या केलीय. सुरेश कुमार असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याप्रकरणी सुरेश कुमार यांच्या वडिलांनी आपल्या सूनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी सुरेशच्या कुटुंबीयांनी केलीय.

हे सुद्धा वाचा

सुरेश कुमार आणि नेत्रा कोयमपट्टूर इथं आपल्या दोन मुलींसह राहत होते. सुरेश मजुरीचं काम करायचा. तर नेत्रा एका कारखान्यात कामाला होता. एक महिन्यापूर्वी नेत्रा कामावरुन पुन्हा घरी परतलीच नाही. तिचा शोधही घेतला गेला. पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, नुकतंच पोलिसांनी नेत्राला शिवमोग्गा येथून ताब्यात घेतलं. तिची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तिने पोलिसांसमोर कबुली देताना म्हटलं की, तिला सुरेशकुमार सोबत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकरासोबत तिने लग्न केलं होतं. त्याचे फोटोही तिने सुरेशकुमार यांना पाठवले होते.

आपल्या बायकोचे तिच्या प्रियकरासोबत असलेले फोटो पाहून सुरेश कुमार हादरला होता. आता काय करायचं, हे त्याला सुचत नव्हतं. अखेर रविवारी राहत्या घरातच सुरेशकुमार याने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.