नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir news) एका अतिरेक्यानं हिंदू बँक मॅनेजरची (Hindu Band manager killing) गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. त्यानंतर आता काश्मिरातल्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे. एका एन्काऊंटरमध्ये बँक अतिरेक्याची हत्या करणाऱ्याचा खात्मा करण्यात आला आहे. एका चकमकीत या अतिरेक्याला (Kashmir LeT Militants) कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. एकूण दोन अतिरेकी हिंदू बँक मॅनेजरच्या हत्येला जबाबदार होते. हिंदू बँक मॅनेजरची हत्या केल्यानंतर संपूर्ण काश्मिरातील हिंदूंमध्ये दहशतीचं वातावरण होतं. अखेर आता लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या दोघांपैकी एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आलाय.
2 जून रोजी सकाळीच काश्मिरातील एक बँकेमध्ये घुसून बँक अधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हा बँक मॅनजर मूळचा राज्यस्थानातील राहणारा असून त्याचं नाव विजय कुमार होतं. हत्येच्या या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलेलं होतं.
विजयच्या हत्येनंतर काश्मिरात प्रचंड दहशत माजली होती. कारण हिंदू बँक मॅनेजरच्या हत्येआधी एका शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या करण्यात आलेली. त्यामुळे हिंदूच्या टार्गेट किलिंगचा मुद्दा उपस्थित केला जात होता.
#ShopianEncounterUpdate: One of the killed #terrorists has been identified as Jan Mohd Lone of #Shopian. Besides other #terror crimes, he was involved in recent killing of Vijay Kumar, Bank manager on 2/6/22 in #Kulgam district: IGP Kashmir@JmuKmrPolice https://t.co/ltyIDWSGQj
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 14, 2022
बुधवारी रात्री करण्यात आलेल्या चकमकीत अखेर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्याचं नाव जान मोहम्मद लोन असं असून तो शोपियानचा होता. विजय कुमारच्या हत्येमध्ये त्याचा हात होता, अशीही माहिती पुढे आलीय. काश्मिरची आयजीपींनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही माहिती काश्मिर पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवर देण्यात आलीय.
हिंदूंवर केल्या जाणाऱ्या टार्गेट किलिंगचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काश्मिरातील अनेक हिंदूंनी स्थलांतर केलंय. प्रचंड दहशतीत असलेल्या हिंदू नागरिकांनी काश्मीस रोडण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षभरापासून काश्मिरात पुन्हा एकदा अतिरेक्यांकडून हिंदूना टार्गेट केलं जात असल्याचं दिसून आलं होतं. हिंदूमध्ये दहशत पसरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या हत्येच्या सत्रामुळे एकच खळबळ उडालेली होती. यानंतर जम्मू काश्मिरात आंदोलनंही करण्यात आलेली.