KDMC Crime | प्राणघातक हल्ल्यात व्यापारी जखमी, भाजपच्या माजी नगरसेवकास बेड्या
खंडणीप्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्या केल्यामुळे केडीएमसीचे माजी नगरसेवक सचिन खेमा (Sachin Khema) यांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे .न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ठाणे : खंडणीप्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला (Attack) केल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा (Sachin Khema) यांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली असून या प्रकरणातील चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 5 जानेवारी रोजी कल्याण येथील एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
अमजद सय्यद यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार 5 जानेवारी रोजी पहाटे कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद यांच्यावर काही माथेफिरुंनी प्राण घातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सय्यद गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यात भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी व सतीश पोकळ या लोकांचा सहभाग होता.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केल्यामुळे मारहाण
सचीन खेमा यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील करत आहेत. सचिन यांनी किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली. याचाच राग मनात धरून अमजद यांच्यावर हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर अमजद यांच्याकडून पैसे मागण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करत आहेत. सतीश पोकळ यांना अगोदर अटक करण्यात आलं होतं. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या :
Pune Crime | पुण्यात बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण