Thane Shivsena : केदार दिघे यांना मुंबई पोलिसांकडून समन्स, बलात्कार पीडित महिलेला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

केदार दिघे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. त्यामुळं केदार दिघे हे पोलीस ठाण्यात चौकशीला केव्हा हजर राहतात, हे पाहणं महत्त्वाच राहणार आहे.

Thane Shivsena : केदार दिघे यांना मुंबई पोलिसांकडून समन्स, बलात्कार पीडित महिलेला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल
केदार दिघे यांना मुंबई पोलिसांकडून समन्स
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 4:44 PM

मुंबई : केदार दिघे (Kedar Dighe) यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं. पीडित महिलेला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात समन्स बजावण्यात आलंय. शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख (Thane District Head) केदार दिघे यांच्यावर एन. एम. जोशी मार्ग पोलीस (N. M. Joshi Police) ठाण्यात बलात्कार पीडितेला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातला मुख्य आरोपी रोहित कपूर आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत. या प्रकरणी केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स पाठविलं आहे. परंतु, या समन्सवर ठराविक दिवसाची तारीख टाकण्यात आली नाही. लवकरात लवकर हजर राहा, असं सांगण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ

मुख्य आरोपी रोहित कपुरवर बलात्काराचा गुन्हा

या प्रकरणात रोहित कपुर हा मुख्य आरोपी आहे. बलात्कार पीडितेनं तक्रार दिली. त्यानुसार, रोहित कपूर आणि केदार दिघे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असा जबाब नोंदविला होता. कपूर आणि दिघे या दोघांवरही एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. केदार दिघे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. त्यामुळं केदार दिघे हे पोलीस ठाण्यात चौकशीला केव्हा हजर राहतात, हे पाहणं महत्त्वाच राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

तक्रार देऊ नये म्हणून धमकावलं

या प्रकरणी रोहित कपूरवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मूळ बलात्काराचा गुन्हा हा रोहित कपूरनं केला होता. याची वाच्यता कुठंही करू नये. किंवा पोलिसांत तक्रार होऊ नये, याप्रकरणी केदार दिघे यांनी बलात्कार पीडितेला धमकवल्याची तक्रार बलात्कार पीडितेनं केली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, रोहित कपूर याने 28 जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित युवतीनं तक्रार करू नये, म्हणून तिला धमकविल्याचं तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी दिघेविरोधात धमकी तर रोहित कपुरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.