तिने मद्याच्या बाटल्या आणल्या, मात्र भलताच माल सापडल्यावर पोलिसही झाले अवाक्, कुठे घडला हा प्रकार ?

| Updated on: Jun 22, 2023 | 12:20 PM

देशात सध्या ड्रग्स आणि सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली विमानतळावर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याच प्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी एका महिलेला अटक केली आहे.

तिने मद्याच्या बाटल्या आणल्या, मात्र भलताच माल सापडल्यावर पोलिसही झाले अवाक्, कुठे घडला हा प्रकार ?
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us on

नवी दिल्ली : सध्या देशात ड्रग्स (drugs) आणि सोन्याच्या (gold smuggling) तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशांतील विमानतळांवर अशा अनेक घटना समोर येत असून आता दिल्ली विमानतळावरही अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका केनियन महिलेला ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिच्याकडे तब्बल 38 कोटी रुपयांचे कोकेन सापडले होते. तिने व्हिस्कीच्या बॉटलमध्ये (whisky bottle) कोकेन लपवून आणले होते. हे पाहून अधिकारीही अवाक् झाले होते.

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही 19 जून रोजी दिल्ली येथे पोहोचली. तिथे विमानतळावर उतरल्यानंतर तिने ग्रीन चॅनेल पार केले. मात्र संशय आल्यामुळे अधिकाऱ्यांनी तिला रोखले व झडती घेतली असता तिच्याकडे कोकेन भरलेल्या व्हिस्कीच्या तीन बाटल्या सापडल्या. त्या बाटल्यांची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये 2.5 किलोग्रॅम कोकेन सापडले. ज्या बॅगमध्ये व्हिस्की सापडली ती बॅग नैरोबी येथे आपल्याला देण्यात आली होती व दिल्लीत एका व्यक्तीकडे सोपवायची होती, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या महिलेने दिली.

सध्या या महिला प्रवाशाला अटक करून कोकेन जप्त करण्यात आले आहे. तिला मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या आठवड्यातही पकडण्यात आले 13 कोटींचे कोकेन

ड्रग्सची तस्करी पकडण्यात आल्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधी सहा दिवसांपूर्वीसुद्धा दिल्ली विमानतळावरच एका केनियन महिलेला तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ही 25 वर्षीय महिलासुद्धा व्हिस्कीच्या दोन बाटल्यांमधून कोकेन घेऊ आली होती, ज्याची किंमत सुमारे 13 कोटी रुपये इतकी होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिला आरोपीलाही इथोपिया येथून आल्यावर अटक करण्यात आली होता.

तपासणीनंतर तिच्याकडे व्हिस्कीच्या दोन बाटल्या सापडल्या, ज्यामध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचे कोकेन मिसळले होते. नैरोबी विनातळावर त्या महिलेला या बाटल्या सोपवण्यात आल्या होत्या, व दिल्लीत एका व्यक्तीला त्या बाटल्या देण्यास सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले होते.

2.42 कोटींचे सोने पकडले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान विनातळावर काम करणाऱ्या खासगी एजन्सीच्या दोन ग्राऊंड स्टाफ मेंबर्सवर अधिकाऱ्यांनी 2.42 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. दोन व्यक्तींची वैयक्तिक झडती घेतली असता त्यांच्याकडून 4.63 किलो सोने जप्त करण्यात आले ज्यांची किंमत सुमारे 2.42 कोटी रुपये इतकी असल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.