तुमच्या हॉटेलमध्ये जेवून आजारी पडले, महिलेचा बनाव, प्रियकराच्या साथीने हॉटेल चालकाकडे खंडणी

एका हॉटेल व्यावसायिकाची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर केरळातील फोर्ट कोची येथे एक महिला आणि तिच्या प्रियकराला शनिवारी अटक करण्यात आली.

तुमच्या हॉटेलमध्ये जेवून आजारी पडले, महिलेचा बनाव, प्रियकराच्या साथीने हॉटेल चालकाकडे खंडणी
महिला आणि तिच्या प्रियकराकडून खंडणी वसुली (फोटो - इंडिया टुडे)
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:10 PM

कोची : तुमच्या हॉटेलमध्ये जेवून आजारी पडले, असं सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न (extort money) करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केरळातील कोची शहरात (Kochi) हा प्रकार घडला. फोर्ट कोची भागातून पोलिसांनी या प्रेमी युगुलाला अटक केली आहे. रिंझीना ही मत्तनचेरी गावची रहिवासी आहे, तर तिचा प्रियकर शाजहान हा फोर्ट कोची गावात राहतो. तुमच्या हॉटेलमध्ये जेवून आजारी पडलो, असं खोटं सांगून दोघे जण हॉटेल (hotel) व्यावसायिकाकडून पैसे उकळत होते. ही जोडगोळी अॅडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी हॉटेलिअर आणि त्याच्या मित्राला बोलावून घेतले होते. तिथे त्याच्यावर हल्ला करत त्याच्याकडील 11 हजार रुपये चोरल्याचाही आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

एका हॉटेल व्यावसायिकाची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर केरळातील फोर्ट कोची येथे एक महिला आणि तिच्या प्रियकराला शनिवारी अटक करण्यात आली. मूळचा मत्तनचेरीची रहिवासी रिंझीना आणि फोर्ट कोचीचा रहिवासी असलेला शाजहान अशी आरोपींची नावे आहेत. ‘इंडिया टुडे’ वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

फोर्ट कोची येथील हॉटेलमधील जेवण जेवल्यानंतर आजारी पडल्याचा आरोप करुन दोघांनी हॉटेल व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हॉटेल चालक आणि त्याच्या मित्राला ते दाखल असलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत बोलावले आणि त्यांच्यावर हल्ला केला. तसेच हॉटेल मालकाचे 11 हजार रुपये चोरले. हॉटेल मालकाने फिर्याद दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. ही महिला यापूर्वीही हनी ट्रॅप घोटाळ्यात सहभागी झाली होती.

संबंधित बातम्या :

जामिनासाठी 50 लाखांची खंडणी मागत धमकी, पोलीस निरीक्षक शालिनी शर्मांसह तिघांवर गुन्हा

विनयभंगाच्या तक्रारीची धमकी, पुण्यातील नगरसेवकाकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी

जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगून खंडणी वसुली, औरंगाबादमध्ये दादागिरी करणारे दोघे रंगेहाथ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.