महिला ब्रँच मॅनेजरचा बँकेतच गळफास, प्रमोशननंतर अवघ्या काही दिवसात आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून बँक मॅनेजर स्वप्ना नैराश्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे (Kerala Branch Manager Suicide in Bank)

महिला ब्रँच मॅनेजरचा बँकेतच गळफास, प्रमोशननंतर अवघ्या काही दिवसात आत्महत्या
केरळात महिला बँक मॅनेजरची कार्यालयातच आत्महत्या
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 8:59 AM

तिरुअनंतपुरम : महिला बँक मॅनेजरने बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्यातून महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. केरळमधील कॅनरा बँकेच्या कुथुपरंबा ब्रांचमध्ये महिलेने आयुष्य संपवलं. (Kerala Kannur Canara Bank Branch Manager commits Suicide in Bank)

प्रमोशननंतर मूळगावापासून दूर नियुक्ती

40 वर्षीय केएस स्वप्ना यांनी बँकेतच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार स्वप्ना यांचं नुकतंच प्रमोशनही झालं होतं. त्रिशूरमधील मूळ गावापासून दूर असलेल्या कन्नूरमधील कुथुपरंबा ब्रांचमध्ये त्यांना बढती मिळाली होती. त्यांची ब्रँच मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती.

बँकेतच सकाळी शालीने गळफास

सकाळी आठ वाजता स्वप्ना बँकेत आल्या. त्यानंतर 8 वाजून 17 मिनिटांनी त्यांनी शालीने गळफास घेऊन ब्रँचमध्ये आत्महत्या केली. बँकेतील सहकारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

महिलेची डायरी पोलिसांच्या हाती

पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वप्ना नैराश्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पोलिसांना स्वप्ना यांची डायरीही मिळाली आहे. त्यावरुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

दरम्यान, महाराष्ट्रातही महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

रत्नागिरीत महिला पोस्टमास्तरचा गळफास

रत्नागिरीतील दापोली तालुक्यात मुरुडमध्ये महिला पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्रीपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी केली असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं.

संबंधित बातम्या :

रत्नागिरी पोस्ट कार्यालय आतून बंद, खिडकीतून दिसलं, महिला पोस्टमास्तरचा गळफास!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

(Kerala Kannur Canara Bank Branch Manager commits Suicide in Bank)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.