रागावलेल्या बायकोने नवऱ्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली अशी पोस्ट, अंगाशी आलं ना राव !
नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर चिडलेल्या पत्नीने रागाच्या भरात असं पाऊल उचललं, ज्यामुळे सगळ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागला. तिची ती एक कृती जाम महागात पडली.
तिरूअनंतपुरम | 21 सप्टेंबर 2023 : केरळमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. तेथे 44 वर्षांच्या पतीशी भांडण झाल्यानंतर त्याच्या 20 वर्षांच्या पत्नीने असं भयानक पाऊल उचललं जे सर्वांनाच खूप महागात पडल. रागवलेल्या बायकोने नवऱ्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा (social media account) वापर करत 11 वर्षांच्या सावत्र नुलीबद्दल अश्लील पोस्ट (shared obscene post) शेअर केली. पण नंतर हे प्रकरण तिच्याच अंगाशी आलं आणि त्या महिलेविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या इसमाच्या लहान मुलीने जेव्हा वडिलांच्या अकाऊंटवरील आपल्योविरोधातील अश्लील पोस्ट पाहिली तेव्हा ती हादरूनच गेली. तिच्या आजीसोबत तिने थेट थोडुपुझा भागातील पोलिस स्टेशन गाठलं आणि यांसदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्या मुलीची सावत्र आईच या सर्व कारनाम्याला जबाबदार असल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत कबूल केला गुन्हा
पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता आपणच सावत्र मुलीविरोधात ही पोस्ट शेअर केली होती, असे त्या महिलेने कबूल केले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती नेहमीच तिच्या अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाबाबत संशय घ्यायचा. ते मूल त्याचं नाही, असा त्याला संशय होता. याच मुद्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असता. ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हाही त्यांच्या या मुद्यावरून वाजलं होतं. अखेर संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात ही पोस्ट अपलोड केली.
अद्याप अटक नाही
आरोपी महिलेला एक लहान मूल आहे, ते अजूनही तिच्यावर अवलंबून असल्याने आम्ही तिला अद्याप अटक केलेली नाही. पण काही दिवसांनी का होईना, आम्हाला तिला अटक करावीच लागेल, असे पोलिसांनी सांगितले.