Ketaki Chitale : वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणी अडचणी संपेना! केतकी चितळे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आलं. त्याआधी तिची कसून चौकशी करण्यात आली होती.

Ketaki Chitale : वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणी अडचणी संपेना! केतकी चितळे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
केतकी चितळेला कोर्टात घेऊन जाताना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:30 AM

ठाणे : शरद पवार (Ketaki Chitale Facebook post on Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट केल्यामुळे अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale Latest News) हिला ठाणे सत्र न्यायालयात (Thane session Court) आज हजर करण्यात आलं. त्याआधी तिची कसून चौकशी करण्यात आली होती. केतकीला ठाणे सत्र न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सगळ्यात आधी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तिच्या फेसबुक पोस्टप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. तिच्यावर कडक कारवाई व्हावी, तिला शिक्षा करावी, अशी मागणीही जोर धरत होती. दरम्यान, पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन केतकी चितळे हिला पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. अखेर आता पोलीस कोठडीनंतर तिची रवानगी ही न्यायलयीन कोठडीत केली जाणार आहे.

जामीनासाठी अर्ज

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेनं जामीनासाठी अर्ज केला आहे. आता तिला जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचंय. पोलीस कोठडी मिळण्याआधी जेव्हा केतकी चितळेला कोर्टात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी तिनं स्वतः आपली बाजू कोर्टात मांडली होती. मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद तिनं स्वतः कोर्टात केला होता.

हे सुद्धा वाचा

केतकीनं नेमकं शरद पवार यांच्याबाबत काय म्हटलं होतं?

Ketaki Chitale Facebook Post

केतकीची पोस्ट

पोलिसांनी केतकीच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. यात तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. अशी माहिती समोर आली आहेत तसेच त्यात तिचे तीन मोबाईलही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सायबर सेलकडून मदत

या प्रकरणात आता सायबर सेलचीही मदत घेण्यात येणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. केतकीच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या तपासात आणखी काय बाहेर येणार, याची उत्सुकता असेल. यात आणकी काही वादग्रस्त सापडतंय का, आणि या पोस्टशी संबंध जोडणाऱ्या गोष्टी शोधण्यावर पोलिसांचा भर असणार आहे.

कुणी सांगितलं म्हणून पोस्ट केली?

केतकी चितळे हीचा बोलविता धनी कोण आहे, या अनुशंगानंही पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे. तिनं कुणाच्या सांगण्यावरुन फेसबुक पोस्ट केली होती का? त्यासाठी तिला कुणी सांगितलं होतं का? याबाबतची पोलिसांकडून तपास केला जातोय.

केतकी चितळे हीनं वकील नितीन भावे यांच्या नावे लिहिलेल्या वादग्रस्त कवितेच्या ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या होत्या. या पोस्टनंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं.

याआधीही केतकी वादात

शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्ट करण्याआधी अभिनेत्री केतकी चितळे अनेकदा वादात राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती. वादग्रस्त पोस्ट केल्यानं वारंवार चर्चेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवारांच्या पोस्टनं तिच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्याआधी केलेल्या पोस्टमुळे तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र तिला अटक करण्यात आली नव्हती.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.