मुंबई – केतकी चितळेला (Ketaki Chitale) ठाणे सत्र न्यायालयाने (Sessions Court, Thane) 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे रबाळे पोलिस आज पुन्हा चौकशीसाठी घेऊन जाणार आहेत. 2020 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणाचा तपास रबाळे पोलिस करत आहेत. पोलिसांनी न्यायालयात अधिक चौकशीसाठी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून केतकी चितळेची पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. केतकी चितळे हीने वापरलेलं प्रत्येक सोशल मीडियाचा पोलिस तपास करीत आहे. केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लॅपटॉप आणि मोबाईलची चौकशी सुरू
मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या चितळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर वकील नितीन भावे यांनी लिहिलेली मराठी कविता पोस्ट केली होती. ज्यामध्ये पवार यांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांच्या वागणुकीवर वैयक्तिक हल्ला केला आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासासाठी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आमचा तांत्रिक तपास सुरू आहे, त्यासाठी आमची टीम आणि सायबर टीम काम करत आहे. अजूनही काम करत आहे दोन दिवसापूर्वी अधिकाऱ्याने सांगितले होते.
नवबौध्द या वाक्याचा संदर्भ देत तक्रार दिली होती
केतकीने 1 मार्च 2020 मध्ये एक पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केल्याने ती पोस्ट अधिक व्हायरल झाली होती. नवबौध्द लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनास येतात. अशा पध्दतीची पोस्ट तिने सोशल मीडियावरती शेअर केली होती. त्यावेळी नवबौध्द या वाक्याचा संदर्भ देत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरूनच आता केतकीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
वादग्रस्त पोस्ट केल्याने चर्चेत
केतकी चितळे हीने आत्तापर्यंत अनेक वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्या आहेत. तसेच वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यामुळे ती अधिक चर्चेत असते. केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे तिची पोस्ट तेव्हा देखील चर्चेत आली होती.
त्यावेळी शिवसैनिकांच्या तिला धमक्या सुध्दा आल्या होत्या. तसेच एका समाजाची लोक मोफत आणि मुंबई पाहायला मिळते म्हणून येतात अशी पोस्ट केतकीने केली होती. त्यावेळी तिच्यावरती ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.