किचनच्या खिडकीतून घरात शिरला, कपाटातील दागिने, पैसे लुबाडले, पोलिसांना माहिती मिळाली आणि……
खेड तालुक्यातील उधळे येथे एका घरफोडीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या पाच तासात उलगडा केला आहे (Khed Police arrest thief within five hours).
रत्नागिरी : खेड तालुक्यातील उधळे येथे एका घरफोडीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या पाच तासात उलगडा केला आहे. या चोरीच्या घटनेतील मुख्य आरोपी हा घरातील किचनच्या खिडकीतून घरात शिरला होता. त्याने घरातील कपाट उघडून सर्व दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू असा एकूण 95 हजार 300 रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आपल्या पथकासह धडक कारवाई करत चोरट्याला अवघ्या पाच तासात बेड्या ठोकल्या (Khed Police arrest thief within five hours).
पोलिसांनी कारवाई कशी केली?
संबंधित घटना ही रविवारी (20 जून) रात्री उधळे येथे घडली होती. ऋतुजा राजेंद्र वेसवीकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने किचनच्या खिडकीने प्रवेश करत दागिन्यांसह पैसे लंपास केले होते. याप्रकरणी ऋतुजा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी संशयितांना ताब्यात घेतलं (Khed Police arrest thief within five hours).
आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
संशयिताची धरपकड केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने आणि पैसे ताब्यात घेतले आहेत. आरोपीचं नाव सुदेश गणपत महाडीक असं आहे. त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला.
संबंधित घटनेचा छडा या तपास पथकाने लावला
संबंधित घटनेचा तपास हा पोलीस अधिक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काशीद, पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कड्डू यांनी केला.
हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल