जावयाच्या हत्येप्रकरणी सासरवाडीतले भोगत होते तुरुंगात शिक्षा, सहा वर्षांनी मयत तरुण जिवंत सापडला

राममिलन चौधरी उर्फ ​​चुनिया याचा भाऊ दिलीप चौधरी याने सासरवाडीतील आठ जणांवर भावाचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला होता.

जावयाच्या हत्येप्रकरणी सासरवाडीतले भोगत होते तुरुंगात शिक्षा, सहा वर्षांनी मयत तरुण जिवंत सापडला
मयत झालेला तरुण सहा वर्षांनी जिवंत सापडलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:52 PM

पलामू : झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या जावयाच्या हत्ये प्रकरणी सासरवाडीतले लोक तुरुंगात शिक्षा भोगत होते, तो जावई सहा वर्षांनंतर जिवंत सापडला आहे. राम मिलन चौधरी उर्फ चुनिया असे या जावयाचे नाव आहे. छतरपूर पोलिसांच्या मदतीने सातरबवा पोलिसांनी राममिलनला अटक केली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, सरिताचा राममिलनसोबत 2009 मध्ये विवाह झाला होता. लग्नात रिवाजाप्रमाणे हुंडाही देण्यात आला होता. मात्र सासरच्या लोकांना अजून पैसे हवे होते. यासाठी ते बहिणीचा छळ करत होते.

अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून बहिणीने पोलिसात छळवणूक प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 498 ए (पतीकडून छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हे सुद्धा वाचा

सासरवाडीतील लोकांना अडकवण्यासाठी रचला कट

छळवणूक प्रकरणी गु्न्हा दाखल केल्यानंतर यातून बचाव करण्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. राममिलन चौधरी उर्फ ​​चुनिया याचा भाऊ दिलीप चौधरी याने सासरवाडीतील आठ जणांवर भावाचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी राममिलनची पत्नी सरिता, सासू कलावती, सासरे राधा चौधरी, मुलीची बहीण, काका यांच्यासह कुदरत अन्सारी, लालन मिस्त्री आणि दानिश अन्सारी यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले. सध्या दानिश अन्सारी तुरुंगात आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

तुरुंगात टाकल्याचा धक्का सहन न झाल्याने पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला. पीडितेचा भाऊ दिपक चौधरीच्या म्हणण्यानुसार त्याने पोलिसांना सांगितले की, राममिलन जिवंत असून तो त्याच्या घरी येत राहतो.

यानंतर छतरपूर पोलिसांनी राममिलन चौधरी उर्फ ​​चुनिया याला भव पुलियाजवळून अटक करून सातबरवा पोलिसांच्या ताब्यात दिले. सातबरवा पोलिस ठाण्याचे प्रभारी हृषिकेश कुमार राय यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.