‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश, अवघ्या 24 तासाच्या आत मुलगी पालकांकडे सुपूर्द

अल्पवयीन मुलगी घरातून अचानक गायब झाली. पालकांनी पोलिसात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी केली.

'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश, अवघ्या 24 तासाच्या आत मुलगी पालकांकडे सुपूर्द
अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबई पोलिसांकडून सुटका
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 5:23 PM

मुंबई : मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासांच्या आत तिला पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत मुलीचा शोध घेतला. विशेष म्हणजे मुलीला ज्या मित्राने पळवून नेले होते, तो आरोपी मुलीला मित्राच्या घरात सोडून बेपत्ता झाला होता. मुलीला पळवून आणल्याची कुठलीच खबर आपल्या मित्राला किंवा त्याच्या घरच्या लोकांना दिली नव्हती. मुलीच्या बाबतीत कुठलीही अनुचित घटना घडण्याआधीच पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

मुंबईतून पळवून नेले आणि नालासोपाऱ्यात सोडले!

आरोपीने अल्पवयीन मुलीला कोणत्या हेतूने पळवून नेले? त्याने मुलीला कुठले आमिष दाखवून नेले का? हे अद्याप उघडकीस आलेले नाही. मात्र त्याने तिला कुठलीही कल्पना न देता मुंबईतील घरातून फूस लावून पळवून नेले आणि नालासोपाऱ्यातील मित्राच्या घरात सोडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. अल्पवयीन मुलीला मुंबईतून विरारच्या दिशेने नेण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली होती. या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना अल्पवयीन मुलीचा थांगपत्ता लावण्यात यश आले. मात्र आरोपी कुठे गेला याचा काही तास पत्ता लागत नव्हता.

आरोपीला काळबादेवी परिसरातून अटक

पोलिसांनी एकाच वेळी नालासोपारा आणि मुंबईमध्ये तपासाची सूत्रे हलवली होती. अखेर अल्पवयीन मुलीला नालासोपाऱ्यात सोडून फरार झालेला आरोपी दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात सापडला. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली आहे. विपुल दत्तात्रय असे 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी 7 जून रोजी पालकांना न सांगता घरातून निघून गेली होती. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी पहाटे अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. यानंतर 24 तासात मुलीचा शोध घेतला.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.