Kalyan Crime : कल्याण स्थानकातील वेटिंग रुममधून 4 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण, मात्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले अन्…

कल्याण रेल्वे स्थानकातून चार महिन्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली. पण पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले अन् मुलाची सुटका केली.

Kalyan Crime : कल्याण स्थानकातील वेटिंग रुममधून 4 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण, मात्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले अन्...
कल्याणमध्ये मुलाच्या हव्यासापोटी चिमुकल्याचं अपहरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 10:10 AM

कल्याण / 8 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये गुन्हेगारी घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. हत्या, घरफोड्या, मारामारीनंतर आता अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. कल्याण स्थानकातील वेटिंग रुममधून 4 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र कल्याण रेल्वे गुन्हे शाखा पोलिसांनी तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आठ तासाच्या आत मुलाचा शोध घेतला. मुलाची सुटका करत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कचरु वाघमारे असे अटक आरोपीचे नाव आहे. मुलाच्या हव्यासापोटी आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण गुप्ता आणि शुभांगी गुप्ता हे आपल्या दोन मुलांसह स्टेशन परिसरात राहतात. पती-पत्नी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. काल सकाळी हे कुटुंब कपडे धुण्यासाठी रेल्वे स्थानकातील वेटिंग रुममध्ये आले. मात्र साबण नसल्याने महिला साबण आणण्यासाठी गेली. यावेळी तिचाी दोन वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा वेटिंग रुममध्ये खेळत होते. महिलेने तिथे असलेल्या एका कुटुंबाला मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र साबण घेऊन परत आली तर मुलगा रुममध्ये नव्हता. महिलेने मुलाचा आजूबाजूला शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

आरोपी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना अटक

अखेर माता-पित्यांनी रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस लगातार सीसीटीव्हीवर लक्ष ठेवून होते. यावेळी रात्री आठच्या दरम्यान कल्याण स्थानकात एक इसम मुलाला घेऊन घाईने नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत मुलाची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली करत त्याची चौकशी केली असता, मुलाच्या हव्यासापोटी त्याने चिमुकल्याचं अपहरण केल्याचं उघड झालं.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.