चॉकलेटच्या बहाण्यानं घेऊन गेला, 8 महिन्यांच्या बाळाचं अपहरण, तपासात टोळी सक्रिय असल्याचं उघड

हा सौदा एका ऑटो चालकाच्या मार्फत झाला. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

चॉकलेटच्या बहाण्यानं घेऊन गेला, 8 महिन्यांच्या बाळाचं अपहरण, तपासात टोळी सक्रिय असल्याचं उघड
नागपूर पोलिसांची टीम.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 6:09 PM

नागपूर : पोलिसांनी लहान मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात यश मिळविले. मात्र यातील तीन आरोपी फरार झालेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अगदी काही तासात अपहरण (चोरीला ) झालेल्या 8 महिन्यांच्या मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी आई वडिलांच्या स्वाधीन केलं. नागपूरच्या कळमना परिसरात काल दुपारी ही घटना घडली. घरासमोरच राहणाऱ्या एका व्यक्तीनं आठ महिन्याच्या बाळाला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. त्यानंतर तो फरार झाला.

आई-वडिलांनी रात्रीपर्यंत शोधाशोध केली. मात्र मिळून न आल्याने रात्री दहा वाजता पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपली चक्रं फिरवलीत. तीन पोलीस स्टेशनचा स्टाफ या कामात लावला. अगदी काही तासात पोलिसांनी या अपहरणकर्त्याचा शोध घेतला.

आधी मुलाला हस्तगत केलं. मग पोलिसांच्या समोर जे आलं ते काही वेगळंच होतं. अपहरण करणारा हा मुलं चोरणारे टोळीतील सदस्य आहे. तो या परिसरात काही दिवसापासून भाड्याची खोली घेऊन राहत होता. यातील जे दलाल होते त्यांच्यापर्यंत मुलाला तो घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या टोळीतील सदस्यांनी एका जणाला मुलगा पाहिजे होता. त्याला बोलावलं आणि अडीच लाखात सौदा केला.

हा सौदा एका ऑटो चालकाच्या मार्फत झाला. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. यापैकी तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. मात्र तीन जण कुणकुण लागताच पळून गेले. पोलिसांच्या मते आणि त्यांना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून ही मुलं चोरणारी टोळी मोठी आहे. यांनी याआधी सुद्धा अनेक मुलं चोरली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आपल्या काळजाचा तुकडा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आईने पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास केला. आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र आता पोलिसांसमोर आव्हान आहे. या टोळीने अशा किती बालकांना आई-वडिलांपासून दूर केलं ते शोधण्याचं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.