तृतीयपंथीयाने मुलांचे प्रायव्हेट पार्ट कापून केले नपुंसक, भीक मागायला लावली, आता कोट्यवधींची संपत्ती…
सीतापूर येथील तृतीयपंथी काजल जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी त्या तृतीयपंथीयावरती भीक मागायला लावणे आणि नपुंसक बनवल्यामुळे कारवाई केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी तीन घरं चार गाड्या अशी मिळून दोन करोड रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
उत्तर प्रदेश : सीतापूर पोलिसांनी (sitapur police) तिथल्या तृतीयपंथीवरती (transgender) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी साधारण आरोपीची दोन करोड रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे. सध्या जेलमध्ये असलेल्या तृतीयपंथीयाने एका मुलाला फसवून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर त्याला भीक मागायला लावली असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर सीतापूर पोलिसांनी चार गाड्या आणि तीन घरं जप्त केली आहेत. पोलिस अजून त्या तृतीयपंथीयाची (UP News) कसून चौकशी करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथीयाने त्याची गँग तयार केली आहे. त्यांची ती टोळी मुलाला गायब करते, त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापतात. एकदा का तो मुलगा नपुंसक झाला की, त्याला भीक मागायला लावतात. त्याचबरोबर त्या मुलांना व्यवसाय सुद्धा करायला लावतात. गेल्यावर्षी ज्यावेळी हे प्रकरण पोलिसांकडे पोहचलं होतं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता तपासली होती. त्याचबरोबर ज्या तरुणांवरती अन्याय झाला आहे. त्यांचा सुद्धा शोध पोलिसांनी घेतला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या तृतीयपंथीयाची सगळी संपत्ती ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये त्या तृतीयपंथीयाची तीन घरं, चार गाड्या, लाखो रुपये सापडले आहेत. ही कारवाई पोलिस पथकाकडून करण्यात आली आहे.
काजल नावाच्या तृतीयपंथीया विरोधात यापुर्वी सुध्दा अनेक गुन्हे पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्या तृतीयपंथीयाने संपत्ती कशा पद्धतीने कमावली याचा त्याच्याकडे पुरावा नाही, म्हणून त्याची संपत्ती ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर मुलांना भीक मागायला लावणं, त्याचं लिंग कापणे असे गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आहेत.
ही घटना उघडकीस आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या तृतीयपंथीवरती कडक कारवाईची मागणी केली आहे.