ओठांचं चुंबन घेणे हा अनैसर्गिक गुन्हा नाही! मुंबई हायकोर्टानं लैंगिक शोषणाच्या आरोपीला दिला जामीन
कुणाच्या ओठाचं चुंबन घेणं आणि प्रेमाने कुणाला स्पर्श करणे, हा भारतीय कलमाच्या 377 अंतर्गत अनैसर्गिक गुन्हा होऊ शकत नाही, असे मत मंबई हायकोर्टानं नोंदवलं आहे.
मुंबई : कुणाच्या ओठाचं चुंबन घेणं (Kissing) आणि प्रेमाने कुणाला स्पर्श करणे, हा भारतीय कलमाच्या 377 अंतर्गत अनैसर्गिक गुन्हा होऊ शकत नाही, असे मत मंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) नोंदवलं आहे. तसचं एका लैंगिक शोषण प्रकरणात एका आरोपी अल्पवयीन तरुणाला जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी नुकताच हा निर्णय दिला आहे. एका 14 वर्षांच्या मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर, गेल्या वर्षी या आरोपीला अटक करण्यात आली होती.
ओठांचं चुंबन घेण्याचं आणि खासगी भागांना स्पर्श केल्याचा आरोप
एफआयआरमध्ये लिहिल्याप्रमाणे, ज्यांनी तक्रार केली होती, त्या वडिलांना असे लक्षात आले की, कपाटातील पैसे गायब आहेत. मुलाने सांगितले की आरोपी तरुणाला हे पैसे दिले आहेत. या मुलाने सांगितले की, तो ऑनलाईन गेम ओला पार्टी रिचार्ज करण्यासाठी मुंबईच्या उपनगरात आरोपी तरुणाच्या दुकानात जात असे. या मुलाचा आरोप आहे की, एक दिवशी तो रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेला असताना, संबंधित तरुणाने त्याच्या ओठाचे चुंबन घेतले आणि अंगाला स्पर्श केला. त्यानंतर वडिलांनी या मुलाचे ऐकून या आरोपी तरुणाच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली होती.
कोर्टाने नेमके काय सांगितले ?
पॉक्सो म्हणजेच कलम 377 कलमात, शारिरिक संभोग किंवा अनैसर्गिक कृत्यांचा समावेश होतो. यात आरोपीला जन्मठेपेचेही शिक्षा होऊ शकते. तसचे या प्रकरणात जामीन मिळणेही अवघड असते. या मुलाने केलेले आरोप आणि त्याची केलेली वैद्यकीय चाचणी विसंगत असल्याचे न्यायाधीश प्रभूदेसाई यांनी सांगितले. या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाचे समर्थन करता येणार नाही. या आरोपीला अधिकतर पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि जामीनही मिळू शकतो, असे कोर्टाने सांगितले.
हे प्रकरण अनैसर्गिक लैंगिक शोषण नाही-कोर्ट
या प्रकरणात अनैसर्गिक लैंगिक शोषण ही बाब प्राथमिक पातळीवर ग्राह्य धरता येणार नाही. या प्रकरणातील आरोपी एका वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये आहे, आणि हा प्रकरणाची सुनावणी लगेच होण्याची शक्यता कमी आहे. सगळे तथ्य पाहता आणि परिस्थितीचा विचार करता, अर्जदाराला जामिनाचा अधिकार आहे. त्यामुळे आरोपीची 30 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.