तो पाठीत खुपसलेल्या चाकुसह पोहचला रूग्णालयात, मग डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची सुरु झाली पळापळ
भांडण दुसऱ्यांचे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूचा हल्ला झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नेमका वाद कशावरुन झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
यवतमाळ : उत्सवाचे फलक लावण्यावरून चौघांनी वाद घातला. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. पाठीत चाकू खुपसातच त्या युवकाने चाकू हाताने घट्ट पकडून ठेवला. त्यामुळे हल्लेखोराला दुसरा वार करण्याची संधी मिळाली नाही. तेवढ्यात कुटुंबातील इतर सदस्य धावून आले, त्यांनी जखमीला चाकूसह थेट शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल केले. हा थरार यवतमाळच्या (yavatmal) लोहारा येथील शिवाजीनगरात (lohara shivajinagar) घडला. दीक्षित विजय हिरणवाडे (३८, रा. रामनगर लोहारा) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमी दीक्षितला तातडीने दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भांडण दुसऱ्यांचे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूचा हल्ला झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नेमका वाद कशावरुन झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु पोलिस चौघांचा शोध घेत असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला झालेल्या तरुणाची अवस्था गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात चाकू रुतला आहे. बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेला सुरुवात केली. या प्रकरणात चौघांवर संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा फोटो सुद्धा व्हायरला झाला आहे.
तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला थोडासा आराम मिळाल्यानंतर पोलिस त्याची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे. तरुण नेमके कोणत्या उत्सवाचे फलक लावत होते याबाबत सुध्दा माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची तिथं असलेल्या लोकांच्याकडून माहिती सुध्दा घेतली आहे. कदाचित जुन्या वादातील प्रकरण असावं अशी पोलिसांना दाट शक्यता आहे.