श्रद्धांच्या हाडांची होणार डीएनए चाचणी, जाणून घ्या कसा असेल तपास?
पोलिसांना सापडलेल्या हाडांचा डीएनए आणि श्रद्धाच्या आई-वडिलांचा डीएनए एकच आहे की नाही, हे आता तपासातून कळणार आहे.
दिल्ली : श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी आफताबने तिचे 35 तुकडे करत दिल्लीतील विविध भागात फेकले होते. पोलिसांनी काही तुकडे गोळा केले असून, या प्रकरणात आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणतात, हे तुकडे खूप जुने झाले असल्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे डीएनए सॅम्पल घेणे खूप आव्हानात्मक असेल. त्यामुळे त्यांच्या डीएनए चाचणीसाठी दोन आठवडे लागतील.
डीएनए चाचणी म्हणजे काय आहे?, या चाचणीत वेळेचे महत्त्व का आहे?, ही चाचणी कशी केली जाते? आणि शरीराच्या कोणत्या अवयवांची तपासणी करून पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचतात?, असे प्रश्न सर्वांनाच पडतात.
डीएनए विश्लेषण म्हणजे काय आणि ते का केले जाते?
डीएनए ही मानवी शरीराची एक अतिशय गुंतागुंतीची रचना आहे, जी पूर्वजांकडून वारशाने मिळते. प्रत्येक माणसाचा डीएनए अनेक बाबतीत अद्वितीय असतो, ज्यावरून त्याच्या आधीच्या पिढीची माहिती मिळते.
पोलिसांना सापडलेल्या हाडांचा डीएनए आणि श्रद्धाच्या आई-वडिलांचा डीएनए एकच आहे की नाही, हे आता तपासातून कळणार आहे.
डीएनए चाचणीसाठी शरीराचे कोणते भाग वापरले जातात?
डीएनए नमुने तपासण्यासाठी मानवी रक्त, थुंकी, मूत्र, दात, नखे, केस, हाडे, लाळ आणि वीर्य यांचा वापर केला जातो. श्रद्धाची हाडे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ते श्रद्धाचे आहेत की नाही हे त्यांच्या नमुन्यांद्वारे निश्चित केले जाईल. याशिवाय सिगारेटचा तुकडा, रुमाल, कंडोम, कंगव्यावरील केसांचाही तपासासाठी वापर केला जातो.
दोन आठवडे का लागतात?
डीएनए चाचणी दरम्यान, नमुन्यात उपस्थित असलेल्या पेशींपासून डीएनए वेगळे केले जाते. यानंतर डीएनए कितपत मिळतोय ते पाहिलं जातं. त्यानंतर त्याच्या कॉपी तयार केल्या जातात. मग त्याची तुलना केली जाते आणि डीएनए एकाच व्यक्तीचा आहे की नाही हा निष्कर्ष फॉरेन्सिक तज्ञ काढतात.
दात किंवा हाडांमधून डीएनए काढण्यासाठी जास्त वेळ लागतो. हे आपण श्रद्धाच्या उदाहरणाने समजून घेऊ. श्रद्धाची हाडे बराच वेळ उघड्यावर पडून होती. त्याचा डीएनए इतर काही डीएनएमध्ये मिसळण्याचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन तपास करावा लागणार आहे.
याशिवाय हाडांमधून डीएनए काढण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासही वेळ लागेल. त्यासाठी दोन आठवडे लागणार असल्याचे सांगण्यात आले. तथापि, ते हाडांचा प्रकार, त्याची रचना आणि किती जाड आहे यावर देखील अवलंबून असेल.