Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मुलगा, 10 वी पर्यंत शिक्षण… मुंबई हिट अँड रन केसमधील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण ?

Worli Hit And Run Accident : मुंबईतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी असलेला 24 वर्षांचा मिहीर शाह हा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. मिहीरने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि मात्र त्यानंतर तो पुढे शिकलेला नाही. तो वडिलांना महाराष्ट्रात बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात मदत करत होता.

शिवसेनेच्या बड्या नेत्याचा मुलगा, 10 वी पर्यंत शिक्षण... मुंबई हिट अँड रन केसमधील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण ?
वरळी हिट अँड रन प्रकरणा
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 8:41 AM

पुण्यातील पोर्श हिट अँड रन अपघाताचे पदसाद अद्याप शमलेले नसतानाच रविवारी पहाटे एका मोठ्या अपघातामुळे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हादरली. वरळी येथे हिट अँड रन प्रकार घडला असून कारचालकाच्या धडकमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. आणि या अपघातास जबाबदार असलेला कारचालक मात्र घटनास्थळावरून तातडीने फरार धाला. या अपघाताप्रकरणी दीर्घ चौकशीनंतर वरळी पोलिसांनी राजेश शहा आणि अपघाताच्या वेळी कारमध्ये बसलेल्या राजर्षी बिदावार याला अटक केली आहे. राजेश शाह हे कार चालवणार आणि अपघातस जबाबदार असलेल्या मिहिर शाहचे वडील आहेत, मात्र मिहीर शाह अपघातानंतर अद्यापही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मिहीर त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी मिहीरच्या गर्लफ्रेंडची चौकशी केली आहे. मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारची दुचाकीवरील दांपत्याला धडक बसली आणि त्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मिहीर शाह नेमका आहे तरी कोण ?

24 वर्षांचा मिहीर शाह हा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. तो 10वीं वर्यंत शिकलेला असून त्याने पुढील शिक्षण घेतलेलं नाही. महाराष्ट्रात बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायात तो त्याच्या वडिलांना मदत करत होता. रविवारी पहाटे अपघात घडला तेव्हा मिहीर शाह हा अतिशय आलिशान अशी बीएमडब्ल्यू कार चालवत होता. तेव्हा त्याच्यासोबत राजर्षी बिदावार हा देखील कारमध्येच होता. पोलिसांनी सध्या त्याल अटक केली असून मिहीर याचा शोध सुरू आहे.

या अपघातानंतर बीएमडब्ल्यू कार ही वांद्रे येथील कलानगर परिसरात बेवारस अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानानंतर मिहीर ऑटोरिक्षात बसून पळू गेला, मात्र त्यापूर्वी तो त्याची कार वांद्रे येथे सोडून गेला होता. राजर्षी बिदावत हे देखील अपघातानंतर ऑटोरिक्षाने बोरिवलीला आले होते.

अपघातानंतर गर्लफ्रेंडच्या घरी गेला मिहीर

हा अपघात घडल्यावर भेदरलेला मिहीर फरार झाला. मात्र तत्पूर्वी तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातातील आरोपीला आश्रय दिल्याबद्दल पोलीस तिचीही चौकशी करत आहेत. तसेच या अपघातप्रकरणी फरार असलेला मिहीर याचे वडील आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारण ज्या कारने अपघात झाला त्या बीएमडब्ल्यू कारची नोंदणी ही राजेश यांच्या नावे करण्यात आलेली आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल

अपघातातील प्रमुख आरोपी मिहीरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात कलम 105, कलम 281 (रॅश ड्रायव्हिंगमुळे मानवी जीवन धोक्यात आणणे), 125-बी (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) 238, 324 (4) अशा कलमांचा समावेश आहे.

या अँगलने पोलिस तपास सुरू

हिट अँड रन प्रकरणाच्या काही तासांपूर्वी मिहीर शाह हा त्याच्या मित्रांसह एका पबमध्ये गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, मिहीरने दारू प्यायली नसून फक्त रेड बुल प्यायल्याचे पब मालकाने सांगितले. घटनेच्या वेळी मिहीर दारूच्या नशेत होता का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

कायदा सर्वांसाठी समान – मुख्यमंत्री

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून कोणालाही सोडले जाणार नाही.  या अपघातासाठी वेगळे नियम नसतील,  कायद्यानुसार सर्व काही केले जाईल. पोलीस कोणालाही वाचवणार नाहीत. मुंबईची दुर्घटना दुर्दैवी आहे. मी पोलीस विभागाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.