कळंबा कारागृह की गुन्हेगारीचा अड्डा? पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सिम कार्ड!

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून यापूर्वीही अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

कळंबा कारागृह की गुन्हेगारीचा अड्डा? पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सिम कार्ड!
कळंबा जेल, कोल्हापूर
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 8:30 AM

कोल्हापूर: कळंबा मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांना शिक्षा भोगण्यासाठी ठेवण्यात येत आहे की उपभोगासाठी? असा प्रश्न आता पडू लागला आहे. कारण, कारागृहात पुन्हा एकदा दोन मोबाईल, सिम कार्ड आणि बॅटरी आढळून आली आहे. मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या 5 जणांकडून मोबाईल फोनचा वापर सुरु असल्याचं बराक झडतीत उघडकीस आलं आहे. रिकाम्या दुधाच्या पिशवीत गुंडाळून हे मोबाईल शौचालयाच्या पाण्यात ठेवले जात असल्याचा संशय कारागृह पोलिसांना आहे. (2 more mobiles, SIM cards seized in Kalamba Central Jail)

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून यापूर्वीही अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांत आतापर्यंत 4 घटनांमध्ये एकूण 15 मोबाईल कारागृह पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातच सुरक्षेशी खेळ सुरु असल्याचं पुन्हा पुन्हा दिसून येत आहे.

पाऊण किलो गांजा आणि 10 मोबाईल!

डिसेंबर 2020 च्या शेवटी कळंबा कारागृहात पाऊण किलो गांजासह 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह असलेले तीन पॅकेट असा 15 हजाराहून अधिकचा मुद्देमाल कारागृह पोलिसांना मिळाला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासन खडबडून जागं झालंय. एका गाडीमधून आलेल्या दोघांनी हे पॅकेट 22 डिसेंबरच्या मध्यरात्री कारागृहात फेकल्याची माहिती पुढे येतेय. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली

कळंबा कारागृहात फेकलेले 10 मोबाईल आणि गांजा प्रकरणात कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांना पुण्यातील येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलं. तर त्यांचा पदभार येरवडा येथील सी. एच. इंदुलकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

चेंडूतून गांजा पुरवण्याचा प्रयत्न

नोव्हेंबर 2020 मध्ये कळंबा कारागृहातील कैद्यांना चेंडूमधून गांजा पुरवण्यात येत असल्याचा प्रकास उघडकीस आला होता. कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षण भिंतीजवळ हा प्रकार समोर आला. या प्रकरणात वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशा तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते तिघेही पुण्याच्या बिबवेवाडी, के. पी. नगरचे रहिवासी आहेत. मित्र प्रेमापोटी चेंडूतून गांजा पुरवल्याची कबुली या तिघांनी दिली. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी 3 टेनिसचे गांजा भरलेले चेंडू जप्त केले होते.

संबंधित बातम्या:

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

2 more mobiles, SIM cards seized in Kalamba Central Jail

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.