Kolhapur Accident : दुचाकीच्या अपघातात 2 तरुण ठार! ऐन गणेशोत्सवात तोरस्कर, कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

अज्ञात अवजड वाहनाने ऋषिकेश आणि विकासच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जबर होती की दोघेही दूरवर फेकले गेल्यानं त्यांना गंभीर जखम झाली. हाताला, पायाला, डोक्याला दुखापत होऊन दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

Kolhapur Accident : दुचाकीच्या अपघातात 2 तरुण ठार! ऐन गणेशोत्सवात तोरस्कर, कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:40 AM

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात (Kolhapur Accident) झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू (Bikers killed in Kolhapur Accident) झाला. मृत्यू झालेल्या तरुणांची नावं विकास तोरस्कर (Vikas Toraskar) आणि ऋषिकेश कांबळे असं आहे. विकासचं वय अवघं 19 वर्ष होतं तर ऋषिकेश 20 वर्षांचा होता. या दोघा तरुणांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

काळीज पिळवटून टाकणारी घटना

कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने विकास आणि ऋषिकेश यांच्या दुचाकीला धडक दिली. विकास आणि ऋषिकेश आपल्या इतर दोन मित्रासोबत कोल्हापूर शहरात गेलेले होते. ते रात्री पुन्हा आपल्या घरी परतत होते. तेव्हा ऋषिकेश आणि विकास एका दुचाकीवरुन येत होते. तर अन्य दोन मित्र दुसऱ्या दुचाकीवर होते. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. तर संपूर्ण गावही दोघा तरुणांच्या मृत्यूने हादरुन गेलं होतं.

कसा झाला अपघात?

घरी परतत असतेवेळी बालिंगा गावाच्या जवळ ऋषिकेश आणि विकासचा अपघात झाला. एका अज्ञात अवजड वाहनाने ऋषिकेश आणि विकासच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जबर होती की दोघेही दूरवर फेकले गेल्यानं त्यांना गंभीर जखम झाली. हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापत होऊन दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

दरम्यान, एका व्यक्तीला हा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर लगेचच अग्निशनम दल, आणि इतर मदत यंत्रणांनी बचावकार्य करण्यासाठी धाव घेतली. जखमी विकास आणि हृषिकेशला सीपीआ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अपघातातील मृत तरुणांची नावे :

  • संतोष संभाजी तोरस्कर, वय 19
  • ऋषिकेश उर्फ सलीम राजाराम कांबळे, वय 20

सगळेच शॉकमध्ये

अपघाताची ही घटना विकास आणि ऋषिकेश यांच्या घरी आणि गावात कळली. त्यानंतर खळबळच उडाली. ऐन गणेशोत्सवात दोन उमदे तरुण ठार झाल्यानं चिंचवडे गावावर शोककळा पसरली. विकास एका खासगी कंपनीत काम करत होता. तर ऋषिकेश शिक्षण घेत होता. या दोघांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्यासोबतच गेलेल्या इतर दोन मित्रांनाही मोठा धक्का बसला. या अपघाताने ते प्रचंड धास्तावलेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास केला जातोय.

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.