कोल्हापूर : जिल्ह्यात चंदगड (Chandgad) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून शेतामुळे दोन कुटुंबामध्ये वाद होत होता. भांडण सोडवण्यासाठी केलेल्या पोलीस पाटलांचा (kolhapur police patil murder) कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संदीप ज्ञानदेव पाटील असं पोलिस पाटील यांचं नाव होतं. संशयित चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिस पाटलांवरती ज्या ठिकाणी हल्ला झाला. त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांना (kolhapur police) घटनास्थळी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिसांनी पोलिस पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी शेतामध्ये संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील यांचे तिथल्या लोकांनी भांडण झाले होते. भांडण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप पाटील हे निवृत्ती राजाराम पाटील, अरुण राजाराम पाटील, योगेश अरुण पाटील यांना समजवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथं त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यावेळी पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या संशयावरुन पोलिस पाटील यांच्यावरती कोयता, खुरप्याने वार केला, त्यामुळे त्यांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस पाटलांचा खून झाल्यामुळे भागात शांतता पसरली आहे. भागातील लोकं घरी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचं सांत्वन करीत आहेत.