CCTV : कोल्हापुरात एका घरावर तिघांची तुफान दगडफेक! रातोरात घरावर झालेल्या हल्ल्याने खळबळ
स्त्यावर असलेले मोठमोठे दगड, घराच्या बाजूला असलेल्या दगडांची जमवाजमव करत तिघांनी घरावर दगड भिरकावले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur News) पूर्व वैमनस्यातून एका घरावर दगडफेक करण्यात आली. फुलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्या घरावर हल्ला करण्यात आल. मध्यरात्री हा हल्ला (Kolhapur Attack on Home) करण्यात आला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी हल्ल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सुमारे पंधरा मिनिटं सलग दगडफेक केली जात होती. पोलिसांनी (Kolhapur Police) या दगडफेक प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जातो आहे. सध्या या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. मात्र रातोरात घरावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
सीसीटीव्ही फुटेजही समोर
दगडफेकीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. पंधरा मिनिटं दगडफेक सुरुच होती, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमधून स्पष्ट झालंय. तिघांनी मिळून हा हल्ला केला होता. रस्त्यावर असलेले मोठमोठे दगड, घराच्या बाजूला असलेल्या दगडांची जमवाजमव करत तिघांनी घरावर दगड भिरकावले आहेत. या दगडफेकीच्या दरम्यान एक वाहनही रस्त्यावरुन जातं. मात्र कुणाचंच भय नसल्यासारखे तिघे जण घरावर एकामागून एक दगड भिरकावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलेत.
पाहा CCTV :
दगडफेकीत घराचं नुकसान
या दगडफेकीमध्ये घराचा दरवाजा, काचेच्या खिडक्या, घरातील सामान यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र दगडफेक होत असल्याचं कळल्यानंतर घरातील सगळेच धास्तावले होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांत अखेर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय.
रातोरात झालेल्ला दगडफेकीच्या घटनेनं परिसरात दहशत पसरली आहे. नेमका हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला आणि का केला गेला? याची चौकशी सध्या पोलीस करत असून एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आलंय.