कोल्हापुरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या, 27 वर्षीय तरुणाला अटक

संशयित म्हणून प्रदीप पोवार याला ताब्यात घेण्यात आलं होतं. अनेकांनी दुपारी प्रदीपबरोबर पीडितेला पाहिलं होतं. रात्री पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच प्रदीप पोवार याने गुन्ह्याची कबुली दिली.

कोल्हापुरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या, 27 वर्षीय तरुणाला अटक
कोल्हापुरात बालिकेवर अत्याचार करुन खून
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 3:03 PM

हातकणंगले : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून करणाऱ्या प्रदीप दिलीप पोवार (वय 27 वर्ष) या संशयिताला काल रात्री ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोवारकडुन यापूर्वीही मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्या होत्या, पण त्या स्थानिक पातळीवर न मिटवता तक्रार दाखल झाली असती, तर आज चिमुकल्या बालिकेचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खोची गावच्या ग्रामस्थांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण केली.

काय आहे प्रकरण?

हातकणंगले तालुक्यातील खोची इथे पीडिता आई-वडिलांसह राहत होती. परिस्थिती गरीबीची असल्याने दोघेही मोलमजुरी करत होते. पाडित बालिका अंगणवाडीत शिकत होती. नेहमीप्रमाणे आई रविवारी सकाळी कामाला गेली होती, तर वडील घरीच होते. बालिकेसाठी आईने जेवणाचा डबा भरुन ठेवला होता.

सकाळपासून बालिका बेपत्ता

आई दुपारी घरी आल्यानंतर जेवणाचा डबा तसाच भरलेला दिसल्याने त्यांनी मुलीची शोधाशोध सुरु केली. बोबडे बोल बोलणाऱ्या चिमुकलीने गल्लीत सर्वांनाच लळा लावला होता. त्यामुळे गल्लीतील सर्व जणच तिचा शोध घेऊ लागले. पण ती कुठेच सापडली नाही. सायंकाळी तिचा मृतदेह कब्रस्तानमध्ये आढळून आला.

आरोपीची कबुली

संशयित म्हणून प्रदीप पोवार याला ताब्यात घेण्यात आलं होतं. अनेकांनी दुपारी प्रदीपबरोबर पीडितेला पाहिलं होतं. रात्री पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच प्रदीप पोवार याने गुन्ह्याची कबुली दिली.

यापूर्वीही तरुणींची छेडछाड

प्रदीप पोवार हा अविवाहित असून तो व्यसनी होता. पंधरा दिवसांपूर्वी एका मुलीची त्याने छेड काढली होती. तर त्यापुर्वी त्याने अनेक छेडछाड केल्याच्या घटना घडल्या होत्या. पण स्थानिक पातळीवर प्रत्येक वेळेला हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला कायद्याची भीती राहिली नव्हती. त्यावेळी कारवाई झाली असती तर चिमुकल्या पीडितेला जीव गमवावा लागला नसता.

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ खोची ग्रामस्थांनी आज (मंगळवारी) गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. पेठवडगांव पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा गतिमान करत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीसह मयत बालिकेच्या घराजळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान आमदार-खासदारासह अन्य लोकप्रतिनिधींनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता. डीवायएसपी रामेश्वर वैंजाने, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, पीआय संतोष घोळवे यांच्यासह कर्मचारी ठाण मांडून बसले होते.

संबंधित बातम्या :

सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून, मृतदेह झुडपात फेकला, कोल्हापुरातील संतापजनक घटना

सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या

धक्कादायकः मोबाइलवर मुलगा काय पाहत होता कळलंच नाही, औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.